नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरात घातक नायलॉन व चायनीज मांजाच्या (Nylon Manja) वापरात आणि विक्रीतही तरुण वर्गाचा भर जास्तीचा आढळला आहे. मांजा विक्री करण्यात आणि वापरण्यात १६ ते २४ वयोगटातील तरुणांचा समावेश सर्वाधिक असून आत्तापर्यंत पोलिसांनी केलेल्या कारवाईत (Action) १८ ते २४ वयोगटातील सर्वाधिक विक्रेत्यांना पकडले आहे. तर नायलॉन मांजा वापर करणाऱ्यांवर अद्याप ठोस कारवाई झाली नसल्याने अल्पवयीन मुलेही या मांजाचा सर्रास वापर करत असल्याचे वास्तव आहे.
म्हसरुळ पोलिसांनी (Mhasrul Police) मखमलाबाद रोडवरील शांतीनगर परिसरात रविवारी (दि.१५) रात्री कारवाई करीत आदित्य सुरेश सनदे (१८, मखमलाबाद नाका) यास २ हजार ८०० रुपयांच्या नायलॉन मांजासह पकडले. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अंबड पोलिसांनी संशयित मयूर नंदकिशोर सोनवणे (२७, रा. राजरत्न नगर, सिडको) यास पकडले आहे. पोलिसांनी मयुरकडून १६ हजार ८०० रुपयांचा मांजाच साठा जप्त केला.दोघांविरोधात पोलिस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तसेच पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल आहे.
दरम्यान, याआधीह शहर पोलिसांनी (Police) महिनाभरात सात संशयितांना अटक केली असून त्यांच्या सुमारे १ लाख ८० हजार रुपयांचा मांजाचा साठा जप्त केल आहे. त्यातही १८ ते २४ वयोगटातील संशयितांच सहभाग आढळून आला आहे येत्या काही दिवसांत शह पोलिस रेकॉर्डवरील नायलॉन मांजा विक्रेत्यांना ठराविक दिवसांकरीता शहरातून हद्दपा करणार आहेत. तसेच यंदा मांज विक्रेत्यांची साखळी उजेडात आल्याने त्यांच्यावर मकोक कायद्यानुसार गंभीर कारवाई करण्याचा विचार शहर पोलिस करत असल्याचे समजते.
भीती नाहीच, धोकेही माहिती नाही
नायलॉन मांजाचा साठा करणाऱ्याऱ्यांसह विक्री करणाऱ्यांवर कारवाई सुरु आहे. त्यामुळे विक्रेते चोरीछुप्या पद्धतीने मांजा विक्री करत असल्याचे आढळून येते. मात्र नायलॉन मांजाचा वापर करणायांवर ठोस कारवाईच झाली नसल्याने वापरकर्ते निर्धास्त आहेत. अल्पवयीन मुलांकडेही सर्रास नायलॉन मांजा आढळून येत असून या माजाचा वापर करून पंतग उडवण्यावर या मुलांचा सर्वाधिक भर दिसतो, मात्र त्यामुळे पर्यावरणासह पक्षी, मनुष्यांना गंभीर दुखापती होण्याचा धोका कायम आहे