नाशिक | प्रतिनिधी | Nashik
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांच्या आदेशाने बेशिस्त रिक्षाचालकांना (Rickshaw) शिस्त लागावी, याकरता आयुक्तालयाच्या हद्दीत ८६० रिक्षांची तपासणी करून २४२ गुन्हे तर ८१७ अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईदरम्यान १६ रिक्षा स्क्रॅप करण्यात येऊन ५ लाख ८२ हजार ९५० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
पोलीस आयुक्तालय हद्दीतील वाहतूक शाखा व पोलीस ठाणे (Police Station) अंतर्गत या कारवाया करण्यात आल्या. युनिट-१ हद्दीत ३४ गुन्हे व ७६ अदखलपात्र गुन्हे, युनिट २ हद्दीत ६३ गुन्हें व १०८ अदखलपात्र गुन्हे, युनिट-३ हद्दीत २२ गुन्हे व ३९ अदखलपात्र गुन्हे, युनिट-४ हद्दीत २४ गुन्हे व १८७अदखलपात्र गुन्हे, द्वारका युनिट हद्दीत १६ गुन्हे व ८० अदखलपात्र गुन्हे, सातपूर युनिट हद्दीत तीन गुन्हे व ६५ अदखलपात्र गुन्हे, एक्स्लो युनिट हद्दीत १० गुन्हे व ४४ अदखलपात्र गुन्हे, आडगाव पोलीस ठाणे हद्दीत आठ गुन्हे व सहा अदखलपात्र गुन्हे, म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत १३ गुन्हे व १० अदखलपात्र गुन्हे, पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत दोन गुन्हे, सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत एक गुन्हा व ३३ अदखलपात्र गुन्हे दाखल केले.
तसेच गंगापूर पोलीस ठाणे (Gangapur Police Station) हद्दीत दोन गुन्हे तर ३५ अदखलपात्र गुन्हे, भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत १४ गुन्हे व पाच अदखलपात्र गुन्हे, मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीत सात गुन्हे व तीन अदखलपात्र गुन्हे, अंबड पोलीस ठाणे हद्दीत दोन गुन्हे व १९ अदखलपात्र गुन्हे, चुंचाळे पोलीस ठाणे हद्दीत तीन गुन्हे व नऊ अदखलपात्र गुन्हे, इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत १६ गुन्हे व दोन अदखलपात्र गुन्हे, उपनगर पोलीस ठाणे हद्दीत दोन गुन्हे व ४३ अदखलपात्र गुन्हे, नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीत २३ अदखलपात्र गुन्हे तर देवळाली पोलीस ठाणे हद्दीत ३० अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले.
दरम्यान, आयुक्तालय हद्दीत कारवाईदरम्यान २४२ गुन्हे व ८१७ अदखलपात्र गुन्हे (Case) दाखल करून १६ रिक्षा स्क्रैप करण्यात येऊन ५ लाख ८२ हजार ९५० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
पोलिसांच्या कारवाईचे स्वागत
आयुक्तालय हद्दीत पोलिसांतर्फे चौकाचौकांत जाऊन रिक्षाचालकांचे प्रबोधन करण्यात आले. यावेळी रिक्षाचालकांनी आवश्यक कागदपत्रांसह गणवेश परिधान करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. सध्या रस्त्यावर असलेल्या रिक्षांचे चालक गणवेश परिधान केलेले दिसून येत असल्याने नाशिककरांनी पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले आहे.





