Tuesday, January 20, 2026
HomeनाशिकNashik Crime : बीचवर बसून नाशिककरांना गंडा; तीन सायबर चोरटे ताब्यात

Nashik Crime : बीचवर बसून नाशिककरांना गंडा; तीन सायबर चोरटे ताब्यात

नाशिक ग्रामीण पोलिसांची कारवाई

नाशिक | प्रतिनिधी | New Nashik

गोव्यातील समुद्रकिनारी बसून नाशिकमधील (Nashik) नागरिकांची फसवणूक (Fraud) करणाऱ्या तिघा सायबर चोरट्यांना (Cyber Thieves) पकडण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांच्या सायबर सेलला यश आले आहे. एका गुन्ह्यातील १५ लाख रुपये हस्तगत करण्यात आले असून टोळीच्या अटकेने आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

या प्रकरणी देवळा तालुक्यातील (Deola Taluka) सांगवी येथील एकाने पोलिसांकडे तक्रार दिली होती. तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिले होते. त्यानुसार सायबर पोलीस ठाण्याचे (Cyber Police Station) पोलीस निरीक्षक नागेश मोहिते, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर थोरात, हवालदार प्रमोद जाधव, शिपाई सोहेल मुलाणी, राहुल भोर, दिक्षा मोरे, हवालदार हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम आदींनी तांत्रिक तपास सुरू केला.

YouTube video player

या तपासानुसार पोलिसांनी गोव्यातील (Goa) कंलिगुट येथून उज्वल धर्मेंद्र बिरथरे (रा. इमलीरोड, मानपूर, इंदौर) अमन राजेंद्र शर्मा (रा. मानपूर, इंदौर) आणि चेतन दिलीप राठोड (रा. लोणीपुरा राव, इंदौर) या तिघांना अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी देवळा येथील तक्रारदाराचे १५ लाख रुपये परत मिळवले. या तिघांनी आणखी किती जणांची फसवणूक केली, याचा तपास पोलीस (Police) करीत आहेत.

अशी करीत होते फसवणूक

संशयितांनी मारवाडी फायनान्स ब्रोकर ऑनलाईन ट्रेडिंग आणि मारवाडी फायनान्स कॉल आणि ट्रेड या नावाने वेबसाईट्स तयार केल्या. देवळा येथील तक्रारदाराला ही लिंक व्हॉटस्अॅपवर मिळाली. तक्रारदाराला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असल्याने त्यांनी संपर्क साधला. त्यावेळी तक्रारदाराला विविध आमिष दाखवून आणि गुंतवणूक कशी करायचे हे सांगत वर्च्यूअल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले. विश्वास बसल्याने तक्रारदाराने संशयास्पद बँक खात्यात ३२ लाख ५ हजार ९०० रूपये भरले. त्यात वाढ होत असल्याचे संशयिताच्या पोर्टलवर दिसत होते. ८३ लाख ३९ हजार रूपये झाल्यानंतर तक्रारदाराने काही रक्कम काढण्याची चौकशी केली. त्यावर २० टक्के आयकर भरण्याबाबत सांगितले. तक्रारदाराला संशय आल्याने त्यांनी बँकांशी संपर्क साधला. त्यात फसवणूक झाल्याचे पुढे आले.

संपर्क साधवा

अनोळखी फोन कॉल्सवर विश्वास ठेवून नागरिकांनी आपल्या वैयक्तिक बँक खात्याची माहिती देऊ नये. बँका अशी माहिती कॉल्सवर अथवा व्हॉटस्अॅपवर विचारत नाही. तरीही फसवणूक झाल्यास नागरिकांनी लागलीच जवळील पोलीस ठाण्याशी संपर्क गण्याशी संपर्क साधवा. तसेच ऑनलाईन तक्रार करण्यासाठी १९३०, १९४५ यांना किंवा सायबर पोलीस ठाण्याच्या ०२५३-२२००४०८ अथवा ७६६६३१२११२ या क्रमाकांशी संपर्क साधवा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ताज्या बातम्या