Wednesday, January 7, 2026
HomeनाशिकNashik Crime : रोज थोडं थोडं मरण्यापेक्षा...; पंचवटीत सुसाईड नाेट लिहून नवविवाहितेची...

Nashik Crime : रोज थोडं थोडं मरण्यापेक्षा…; पंचवटीत सुसाईड नाेट लिहून नवविवाहितेची आत्महत्या

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मंत्री पंकजा मुंडे (Minister Pankaja Munde) यांच्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नीने (Wife) सासरला त्रासून आत्महत्या केल्याचे प्रकरण चर्चिले जात असताना पंचवटी परिसरातही सासरच्यांवर अतिशय गंभीर व संवेदनशील आरोप करुन ‘सुसाइड नोट’ लिहून नवविवाहितेने आत्महत्या (Suicide) केली. नेहा संतोष पवार (वय २७, रा. हिरावाडी) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी सासरकडील संशयितांवर पंचवटी पोलिसांत गुन्हा नाेंद झाला आहे. 

- Advertisement -

बुधवारी (दि. २६) दुपारी एक वाजेच्या सुमारास नेहा हिने घरात ‘सेल्फाॅस’ विषारी पावडर सेवन केल्याने तिला पतीने (Husbend) खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान सायंकाळी पावणे पाच वाजता मृत घोषित केले. नेहा यांच्या मृत्यूची माहिती मिळताच नातलगांसह आप्तेष्टांनी रुग्णालयासह पोलीस ठाण्यात (Police Station) गर्दी केली. दरम्यान, नेहा संतोष पवार उर्फ नेहा बापू डावरे यांनी पोलिसांना उद्देशून एका वहीत ‘सुसाइड नोट’ लिहिल्याचे आकस्मिक मृत्यूच्या सुरु असलेल्या तपासात उघड झाले आहे. 

YouTube video player

सुसाईड नोटमध्ये नेमकं काय?

‘माझे नाव नेहा बापू डावरे उर्फ नेहा संतोष पवार असून माझे लग्न ४ जून २०२५ रोजी रेशीमबंध बँक्वेट हॉटलमध्ये झाले. १० मार्च रोजी सुपारी फोडल्यावेळी माझ्या सासरच्यांनी म्हंटले की, हुंडाप्रथा बंद आहे. तरी तुम्ही नवरदेवास त्याच्या अटी-शर्तीनुसार सोने, चांदी, पाच भांडे द्या. त्यानुसार माझ्या माहेरच्यांनी धुमधडाक्यात लग्न लावून दिले. लग्नानंतर माहेरचे भांडण करीत नाही पण, मानसिक त्रास देतात. मोबाईलवर सारखी बोलते, घरकाम येत नाही, पतीला उलटसुलट सांगते. सिलिंडर टाकी एक महिन्यातच संपते. पतीचे लग्नाआधीपासून एका युवतीसोबत प्रेमसंबंध असून, पतीने तिला दोघांचे अश्लिल फोटो दाखवले होते. सासरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने आणि सासरचे लोक पैशांची मागणी करू लागल्याने माहेरहून २० हजार रूपये आणून दिले. दिवाळीसाठी १५ दिवस माहेरी पाठवले. मात्र, दहाव्या दिवशी सासू व पतीने सासरी येण्यास सांगितले. नियमित मासिक पाळी येत नसल्याने सासरच्या लोकांनी त्रास दिला’, असे सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. यासह पोलिसांना उद्देशून ‘भाऊ सासरच्या लोकांना मी लिहिलेली चिठ्ठी सापडली तर ते गायब करतील म्हणून चिठ्ठीचे फोटो काढून तुम्हा सगळ्यांना पाठवत आहे. तुम्ही मला खूप प्रेमाने वाढवली पण माझं नशीब खराब मला सासर आणि नवरा चांगला नाही भेटला म्हणून मी आत्महत्या करत आहे. रोज थोडं थोडं मरण्यापेक्षा मी विष खाऊन झोपत आहे. मी असं केलं तर सासरचे लोक माझी नक्की बदनामी करतील. म्हणून मी हे चिठ्ठेचे फोटो तुला पाठवत आहे’, असे नाेटमध्ये नमूद आहे.

ताज्या बातम्या

पडसाद : कांदा उत्पादकांची परवड सुरुच !

0
शेतकर्‍यांविषयी सर्वच राजकीय पक्षांना पुळका येत असतो, यात आता तसे काही नाविन्य राहिलेले नाही. प्रत्येकजण आम्हीच कसे शेतकरी हितकर्ते असा आव आणतात, हे देखील...