Thursday, January 29, 2026
Homeक्राईमNashik Crime News: १० लाख रुपयांच्या बनावट नोटा खपवण्याचा त्यांचा हेतू, पण...

Nashik Crime News: १० लाख रुपयांच्या बनावट नोटा खपवण्याचा त्यांचा हेतू, पण त्याआधीच ग्रामीण पोलिसांनी पकडलं! नेमकं काय झाल?

मालेगाव | प्रतिनिधी
दहा लाख रुपये किमतीच्या ५०० रुपये दराच्या बनावट चलनी नोटा शहरात खपवण्याचा हेतू बाळगून महामार्गालगत संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोघा परप्रांतीयांना तालुका पोलीस ठाण्याच्या गस्ती पथकाने अटक केली.

या संशयितांकडून ५०० रुपये दराच्या दोन हजार बनावट नोटा, दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. दोघांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता ८ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. तालुका पोलीस ठाण्याचे गस्ती पथक महामार्गावर गस्त घालत असताना त्यांना हॉटेल ए वन सागरजवळ नजीर अक्रम मोहंमद अयुब अन्सारी (३४) व मोहंमद जुबेर मोहंमद अश्रफ अन्सारी (३३, दोघे रा. बुऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) हे दोघे संशयास्पद वावरताना दिसले. या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळील बॅगेत पाचशे रुपये दराच्या २ हजार बनावट चलनी नोटा मिळून आल्या.

- Advertisement -

याबाबत ते पोलिसांकडे समाधानकारक खुलासा करू न शकल्याने पोलिसांचा संशय बळावला. सदर नोटांची छपाई, कागदाचा दर्जा तसेच सुरक्षा धागा तपासल्यावर या नोटा बनावट असल्याचे स्पष्टपणे आढळून आल्याने पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत सखोल चौकशी केली असता या नोटा त्यांनी व्यवहारात आणण्यासाठी मालेगाव गाठले असल्याचे समोर आले.

YouTube video player

या दोघांना पोलिसांनी अटक करत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दोघे संशयित परप्रांतीय असल्याने सदर बनावट नोटा त्यांनी कुठून आणल्या व कोणत्या ठिकाणी ते विक्री करणार होते याची कसून चौकशी उपनिरीक्षक तुषार भदाणे करत आहेत.

अप्पर पोलीस अधीक्षक तेगबिरसिंह संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत बावीस्कर यांच्या मार्गदर्शनात तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती सावंजी, उपनिरीक्षक तुषार भदाणे, हवालदार अमोल शिंदे, प्रकाश बनकर, गणेश जाधव, मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

पडसाद : कणखर प्रशासकाची अकाली एक्झिट

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे- दै. 'देशदूत' - संपादक प्रमोद महाजन (२००६), विलासराव देशमुख (२०१२), गोपीनाथ मुंडे (२०१४) आर. आर. पाटील(२०१५) आणि आता अजितदादा पवार.. महाराष्ट्राने...