सिन्नर | विलास पाटील | Sinnar
राज्याच्या मंत्र्यांसह (Minister) उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची रिघच खरातकडे लागलेली असायची. मात्र, त्यांच्याही आधीपासून खरातचे केंद्रातल्या मातब्बरांशी संबंध जुळले होते. केंद्रातल्या राजकीय घडामोडींमध्ये काय पावले उचलली पाहिजेत यासाठी त्याचा सल्ला घेतला जात असल्याची चर्चा बऱ्याच आधीपासून खरातच्या भक्तांमध्ये व्हायची. सन २०१४ हे केंद्रातल्या सत्तेतील बदलाचे वर्ष होते. भाजपाचे फासे सत्तेच्या दिशेने पडत असताना खरातच्याही सल्ल्याने काही खेळी खेळल्या गेल्याची चर्चा तेव्हा होती. सध्या केंद्रात गृहमंत्री असणारे अमित शहा त्यावेळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. केंद्रात कोणाची सत्ता यावी हे ठरवणाऱ्या उत्तर प्रदेशवर त्यांनी त्यावेळी सर्वाधिक लक्ष दिले होते. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे उत्तर प्रदेशने कौल दिल्याने केंद्रात भाजपाची सत्ता आली आणि नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले.
देशात भाजपाची सत्ता आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शहा यांना बक्षीशी म्हणून गुजरातमध्ये मुख्यमंत्री म्हणून पाठवण्याचा विचार त्यावेळी सुरू झाला. केंद्रात नरेंद्र आणि गुजरातमध्ये शहा असाच एकूण सूर होता. राज्यात गेले तर तिकडेच अडकून पडावे लागेल आणि केंद्रात येण्याचं स्वप्न अपूर्ण राहिल असं त्याने आकडेमोड मांडत शहा यांना समजावून सांगितले. केंद्रात लगेच महत्त्वचाची जबाबदारी मिळणार नसली तरी थोडं सबुरीनंध्या. केंद्रातली महत्त्वाची जबाबदारी तुमच्याकडे चालत येईल असं खरातने स्पष्ट केल्याचे त्याच्या भक्तामध्येचर्चा होती. त्यावेळी शहा यांची भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची दोन वर्षांची मुदत संपत आली होती. दुसरे कुठले तरी पद घेण्यापेक्षा पुन्हा पुढची दोन वर्ष भाजपाचेच राष्ट्रीय अध्यक्ष पद घ्या. त्यानंतर तुम्हाला पाहिजे ते मिळवता येईल असं गणित खरातने मांडल्यानंतर दोघांची बैठक आटोपली होती. त्यानंतर शहांचे विमान दिल्लीकडे तर खरातची गाडी नाशिककडे रवाना झाल्याची चर्चा त्यानंतर अनेक वर्ष खरातच्या भक्तामध्ये होती. या भेटीनंतर काही महिन्यातच शहा यांची पुन्हा दोन वर्षांकरिता भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली.
गुजरात विधानसभा निवडणूक (Gujrat Assembly Election) लागली तेव्हा दिल्लीत पुन्हा कोणी आपल्याला आव्हान देऊ नये म्हणून गुजरातच्या सर्व मातब्बरांची तिकीट कापण्यात आली. देशात भाजपची (BJP) लाट असताना गुजरात भाजपा एक हाती जिंकणार ही काळ्या दगडावरची रेघ होती. त्यावेळी मुख्यमंत्रीपदी (CM) अगदी नवख्या, पहिल्यांदाच विधानसभेला निवडून आलेल्या आमदारांची वर्णी लावून शहा-मोदी जोडीने साऱ्या देशाला धक्का दिला होता. भाजपा पुढची पन्नास वर्ष दिल्लीच्या सत्तेतून हलत नाही असं खरातच अनेक भक्तांजवळ छातीठोकपणे खासगीत बसल्यावर बोलूनही दाखवायचा. पूढच्या काळातही अनेकदा भाजपाच्या बरिष्ठ गोटाला सल्ला देण्यासाठी खरात बारंबार दिल्लीला जायचा. त्यासाठी व्हाया तिरुपती खासगी चार्टर विमान कधी शिर्डीला तर कधी ओझरला यायचे. दिल्लीतल्या खास बैठका आटोपल्या की पुन्हा ह विमानं खरातला शिडी अथवा ओझरला सोडून जायचे अशी चर्चा खरातच्या भक्तांमध्ये ऐकायला मिळते.
ऑस्ट्रेलियात बंगला?
खरातने अनेक देशात आपला भक्तवर्ग तयार केला होता. त्यासाठी भाजपच्याच अनेक वरिष्ठ नेत्यांचं योगदान असल्याची चर्चा आहे. अधून-मधून तो अनेक देशांना भेटीही द्यायचा. वर्षातले किमान दोन महिने तो अमेरीकेत रहायचा. तेथून ‘व्हाईट’ मध्ये बक्कळ पैसा कमवून आणायचा, त्याच पैशावर टॅक्स भरुन प्रॉपर्टी खरेदी करायचा, खरातने आस्ट्रेलियात एक मंदिर बांधले असल्याची चर्चा असून तेथे त्याचा एक आलिशान बंगलाही असल्याची चर्चा त्याच्या भक्तांमध्ये आहे. हा बंगला त्याच्या ऑस्ट्रेलीयातील एखाद्या भक्ताच्या नावावर असल्याचे सांगितले जात आहे हे प्रकरण हाताबाहेर जायचे लक्षण दिसू लागल्यानंतर आस्ट्रेलियाला निघून जाण्याचा त्याचा प्रयत्न होता, त्याने तसे विमानाचे तिकीटही काढले होते अशी चर्चा आहे. मात्र, तो पोलिसांच्या जाळ्यात अडकल्यानं त्याचे आस्ट्रेलियाला जाण्याचे स्वप्न भंगल्याची चर्चा आहे.
शहा यांना मुख्यमंत्री न होण्याचा सल्ला
शहा यांना गुजरात राज्याचे मुख्यमंत्रीपद घेण्यापेक्षा केंद्रातच अधिकरस होता. मात्र, सर्वांचाच आग्रह होऊ लागल्यानंतर त्यांची अडचण होऊ लागली होती. एकदा राज्यात गेल्यानंतर पुन्हा केंद्रात येता येईल याची खात्री नव्हती. आपली ही घालमेल कुठल्यातरी एका निर्णयावर आल्याशिवाय दूर होणे शक्य नव्हते, त्यामुळे खरातचा कौल काय मिळतो ते जाणून घेऊनच पुढचा निर्णय घेण्याचा विचार शहांच्या मनात आला आणि ते थेट विमानाने ओझरच्या विमानतळावर आल्याची चर्चा खरातचे भक्त करतात. त्यापूर्वीच तिरुपती बालाजीच्या विश्वस्तांकडून खरातला सांगावा गेलेला असल्याने तो आपल्या एक-दोन सहकाऱ्यांसह गुपचूप ओझर विमानतळावर गेला. आपल्या बाकी सह्याऱ्यांना चारचाकीतच बसवून तो थेट शहा बसलेल्या विमानात गेला, तेथेच दोघांमध्ये पंधरा-वीस मिनिटेचर्चा झाली. खरातने काही आकडेमोड केली आणि गुजरातचं मुख्यमंत्रिपद त्यांनी घेऊ नये असा सल्ला शहा यांना दिल्याची चर्चा त्याच्या भक्तामध्ये आहे.





