Sunday, November 24, 2024
HomeनाशिकNashik Crime : भावाकडून बहिणीसह दाजीची हत्या; जमिनीच्या वादातून साडगावातील घटनेस वाचा

Nashik Crime : भावाकडून बहिणीसह दाजीची हत्या; जमिनीच्या वादातून साडगावातील घटनेस वाचा

संशयित ताब्यात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या (Nashik Taluka Police Station) हद्दीतील साडगाव शिवारात पारधी दाम्पत्याचे रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह (Dead Body) बुधवारी (दि.६) आढळून आले होते. नाशिक ग्रामीण पोलिसांनी तपास करून दोघांचा खून करणाऱ्यास अटक (ARRE) केली आहे. शेतजमिनीच्या वादातून मृत वृद्धेच्या सख्या भावाने रविवारी (दि.३) भाऊबीजेच्या दिवशी बहिणीसह दाजीला लाकडी दांड्याने मारहाण करून खून केल्याचे उघडकीस आले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Political : दहशत रोखण्यासाठी सीमा हिरेंना निवडून द्या; ज्येष्ठ नेते मामा ठाकरे यांचे मतदारांना आवाहन

सोमनाथ सावळीराम बेंडकोळी (५०, रा. लाडची शिवार, ता. नाशिक) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. साङगाव येथे रामू राधो पारधी (७०) व चंद्रभागा रामू पारधी (६५) या दोघांचे मृतदेह त्यांच्या घरात आढळून आले होते. दोघांना टणक वस्तूने बेदम मारहाण करत जीवे मारल्याचे उघडकीस आले होते. दोघांच्या मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल मिळताच पोलिसांनी तपासास सुरुवात केली. नातलग, गावकऱ्यांकडे तपास केल्यानंतर पोलिसांना संशयित सोमनाथ याच्यावर संशय आला.

हे देखील वाचा : Nashik Political : नाशिक मध्यत हिंदुत्ववादाचाच विजय होणार; आमदार देवयानी फरांदे यांचा विश्वास

त्याच्याकडे सखोल तपास केल्यानंतर त्याने दुहेरी खुनाची कबुली दिली. पारधी दाम्पत्यास मूलबाळ नव्हते. त्यामुळे सोमनाथ हा पारधी यांच्या शेतजमिनीत हिस्सा मागत होता.तर चंद्रभागा पारधी या भावाकडे वडिलोपार्जित शेतजमिनीत वाटा मागत होत्या. त्यावरून दोघांमध्ये वाद होते. भाऊबीजेच्या दिवशी संशयित सोमनाथ हा बहीण चंद्रभागाच्या घरी गेला. त्यावेळीही जागेवरून वाद झाल्याने त्याने लाकडी दांड्याने दोघांना बेदम मारहाण करत खून केला. तीन दिवसांनी दोघांचा खून झाल्याचे उघडकीस आले.

हे देखील वाचा : ‘बहुरंगी आणि बहुढंगी’ आमदार बदलण्याची वेळ : पाटील

दरम्यान, ही कामगिरी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय अधिकारी हरिष खेडकर यांच्या सूचनेने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक सत्यजित आमले, सहाय्यक निरीक्षक संदेश पवार, सहाय्यक उपनिरीक्षक नवनाथ सानप, शिवाजी ठोंबरे, हवालदार संदीप नागपुरे, हेमंत गिलबिले यांच्या पथकाने केली.

हे देखील वाचा :  Nashik News : स्मार्ट कार्ड पोहोचवण्याची लगबग; दोन लाख ४० हजार मतदारांना मिळणार ओळखपत्र

सखोल चौकशीनंतर खुलासा

संशयित मारेकरी सोमनाथ बेंडकोळी हा दोघांना मारल्यानंतर दोन दिवस बाहेर गेला. त्यानंतर घरी परतला. खुनाच्या तिसऱ्या दिवशी दोघांचे मृतदेह आढळून आल्यानंतर संशयित सोमनाथ हा घटनास्थळी गेला. जिल्हा रुग्णालयात, अंत्यसंस्कारात सहभागी झाला. तसेच दुःख व्यक्त करून मी काही केलेच नाही या अविर्भावात वावरत होता. मात्र नातलगांच्या चौकशीत सोमनाथबाबत चौकशी केल्यावर ते काहीच बोलत नसल्याने पोलिसांना त्याचा संशय आला. त्याची सखोल चौकशी केल्यानंतर त्याने खुनाची कबुली दिली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या