Monday, November 25, 2024
Homeक्राईमNashik Crime News : दंगल प्रकरणी ३०० जणांवर गुन्हे दाखल; २० समाजकंटक...

Nashik Crime News : दंगल प्रकरणी ३०० जणांवर गुन्हे दाखल; २० समाजकंटक अटकेत

अनेकांची धरपकड सुरुच

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील दाेन गटांत उसळलेल्या तुफान दंगलीनंतर (Riots) पाेलीस ॲक्शन माेडवर आले आहेत. दंगल घडविण्यासह प्राणघातक हल्ले करणाऱ्या दाेन्ही गटांतील ओळख निष्पन्न झालेले आणि अनाेळखी ३०० समाजकंटकांवर सहा गुन्हे नाेंदविण्यात आले आहेत. तर, २० जणांना अटक (Arrested) करण्यात आली असून ४० जणांची ओळख पटली आहे. पसार झालेल्या २०० ते ३०० जणांचा शाेध भद्रकाली व शहर पाेलिसांची विविध पथके घेत असून अनेक भागांतील सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील ४८ तासांपर्यंत समाजकंटकांची धरपकड सुरु राहणार असून संवेदनशील ठिकाणांवर सशस्त्र पाेलिसांचा बंदाेबस्त कायम आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : दंगलखाेर निघाला ‘एमडी’ डिलर; शहरात दाेन टाेळ्यांचे रॅकेट उघड

बांग्लादेशमध्ये हिंदू समाजावर ( Hindu Society) होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ एका समूहाने शुक्रवारी (दि.१६) पुकारलेल्या नाशिक बंदला (Nashik Bandh) अचानक हिंसक वळण लागले. दाेन वेगवेगळे गट आमनेसामने आले व त्यांनी दगड, विटा, काचेच्या बाटल्या एकमेकांवर फेकून दंगल पेटविली होती. पोलिसांनी वेळीच धाव घेत, परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच दंगल घडविणाऱ्या संशयितांची रात्रीतूनच धरपकड केली. त्यानुसार भद्रकाली पोलिसांनी तब्बल सहा गुन्हे नोंदवित, ४० पेक्षा अधिक दंगलखोर संशयितांची ओळख पटविली. त्यातील २० संशयितांना ताब्यात घेतले असून, उर्वरीत फरारी समाजकंटकांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

हे देखील वाचा : Nashik Crime News : नराधमास जन्मठेप; बारा हजारांचा दंडही ठाेठावला

शुक्रवारच्या बंदचे आवाहन करणारा एक गट जुने नाशिक भागात (Old Nashik Area) शिरल्यानंतर दुसरा गट आक्रमक झाला. त्याचवेळी वाद वाढल्याने दोन्ही गटात तुफान दगडफेक करण्यात आली. यात पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव, चंद्रकांत खांडवी, किरणकुमार चव्हाण, वरिष्ठ निरीक्षक अशाेक शरमाळे, राकेश हांडे यांच्यासह दाेन महिला व दाेन पुरुष अंमलदार आणि चार युवक जखमी झाल्याचे समोर आले. त्यानंतर, भद्रकाली, इंदिरानगर, नाशिकराेड, मुख्यालय, आडगाव, सररकारवाडा, गुन्हेशाखा, पीसीबी-एमओबी, परिमंडळ, एसआरपीएफचा अतिरिक्त बंदाेबस्त बाेलावून भीषण परिस्थिती नियंत्रणात आणली.

हे देखील वाचा : Nashik News : पोलिस व प्रशासनाने संवेदनशीलपणे परिस्थिती हाताळल्याने पालकमंत्री भुसेंकडून कौतुक

दरम्यान, पोलिसांनी (Police) या भागात जागाेजागी बंदोबस्त तैनात केला असून विविध भागातील सीसीटीव्ही, प्रत्यक्षदर्शी तसेच इतर माध्यमांच्या व्हिडीओंचे विश्लेषण करुन तपास केला जात आहे. त्यातून काही समाजकंटकांची ओळख पटविण्यात यश आले आहे. अटकेतील संशयितांना न्यायालयाने पाेलीस काेठडी सुनावली आहे. संवेदनशील भागांत सशस्त्र बंदोबस्त पुढील दोन ते तीन दिवस कायम ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती झाेन एकचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण (Kiran Kumar Chavan) यांनी दिली. 

चौकट

१) ३ गुन्हे जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी (बीएनएस) कलम १०९नुसार दाखल

२) ३ गुन्हे दंगल भडकाविणे, धार्मिक भावना दुखविल्याप्रकरणी विविध कलमान्वये दाखल

३) दंगलखोरांच्या अटकेचा आकडा वाढणार 

४) बंदोबस्त पुढील दोन ते तीन दिवस कायम

परिसरातील चित्र  

दंगलग्रस्त जुने नाशिक परिसरात तणावपूर्ण शांतता प्रस्थापित झाली आहे. जनजीवन पुर्वपदावर आले असून सर्व दुकाने नेहमीप्रमाणे खुली झाली आहेत. नागरिकांकडून खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरळीतपणे सुरू असून दंगल प्रभावित गल्लीबोळांसह परिसरात सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त कायम आहे. सकाळी अकरा वाजेपासून परिसरातील दुध बाजार, भद्रकाली बाजार, मेनरोड बाजार, टाकसाळ लेन, तिवंधा चौक, बागवानपुरा, चौकमंडई हा सर्व परिसर गजबजण्यास सुरूवात झाली होती. 

दाेषींवर कारवाई हाेणारच

दंगलीप्रकरणी सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दाेन्ही गटांतील ३०० जणांचा प्रथमदर्शनी सहभाग आढळताे आहे. २१ संशयितांना अटक करण्यात आली असून पसार झालेल्यांच्या शोधार्थ डीबी व इतर पोलिस पथके रवाना झाली आली आहेत. सीसीटीव्ही, प्रत्यक्षदर्शी तसेच इतर माहितीच्या आधारे तब्बल ४० संशयितांची ओळख पटविण्यात आली आहे.

गजेंद्र पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भद्रकाली पोलिस ठाणे

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या