Saturday, October 5, 2024
Homeक्राईमNashik Crime News : पोलिस अंमलदाराला चाकूने भोसकले

Nashik Crime News : पोलिस अंमलदाराला चाकूने भोसकले

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

दिंडोरी नाक्यावर (Dindori Naka) हातात चाकू फिरवत दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस अंमलदाराच्या पोटावर गुन्हेगाराने (Criminal) चाकूने दुखापत करून जखमी केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. सराईत गुन्हेगार आता खाकीवरच चाल करत असल्याने नागरिकांचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : ‘छोटी भाभी’ एमडी प्रकरण; बेकायदेशीर वसुली उजेडात

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अंमलदारावर (Police Officer) हल्ला करणाऱ्या अवधूतवाडीतील विकी संजय जाधव याला पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे. या हल्ल्याप्रकरणी अंमलदार नामदेव कारभारी सोनवणे (५७) यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात (Panchvati Police Station) तक्रार दाखल केली आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : धनवटे खून प्रकरणात व्यंकटेशवर अंगुलीनिर्देश

शुक्रवारी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमाराला दिंडोरी नाक्यावर गीता हार्डवेअर दुकानासमोर संशयित विकी जाधव हातात चाकू मिरवत दहशत निर्माण करत असताना पोलिस अंमलदार नामदेव सोनवणे हे त्याला पकडत असताना संशयिताने सोनवणे यांच्या पोटावर चाकूने (Knife) वार करून जखमी केले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या