नाशिक | प्रतिनिधी | Nashik
पुणे राेडवरील (Pune Road) बजरंगवाडीत १४ जुलै राेजी घडलेल्या दाेन टाेळ्यांतील ‘फ्रिस्टाईल’ दंगलीत एका पाेलीस अंमलदाराचा सहभाग उघड झाला हाेता. त्यानंतर आता याच टाेळ्यांतील एका संशयिताकडे १९ ग्रॅम एमडी ड्रग्ज आढळले आहे. त्याला नाशिक शहर पाेलिसांच्या (Nashik City Police) एनडीपीएस पथकाने (दि. १६) अटक (Arrested) केली असून ड्रग्ज रॅकेटमधील अन्य पेडलरचा शाेध सुरु केला आहे. राहुल अशाेक ब्राह्मणे (वय २०, रा. बारा खाेल्या, महादेव मंदिराजवळ, बजरंगवाडी, पुणे राेड, नाशिक) असे ड्रग्जपेडलरचे नाव आहे. याशिवाय शहरात अमली पदार्थांची मित्रांकरवी विक्री करुन रँकेट चालविणारा जुुबीन सैय्यद आणि त्याची गँग पाेलिसांच्या रडारवर आली आहे.
बजरंगवाडीत दाेन गटांतील टाेळी युद्धातून (War) दंगल, ताेडफाेड व प्राणघातक हल्ला झाला हाेता. गुन्ह्याच्या तपासात आडगाव पाेलीस ठाण्याच्या गुन्हेशाेध पथकातील अंमलदार इरफान मन्सुर शेख(रा. पाेलीस वसाहत, गंगापूर राेड) याचा प्रत्यक्ष सहभाग उघड झाला हाेता. त्यामुळे पुराव्यांनुसार मुंबईनाका पाेलिसांनी अटक केली हाेती. हा अंमलदार तडिपार संशयित जुबीन सैय्यद याच्याशी असलेली कट्टर मैत्री निभावण्यासाठी बजरंगवाडीत शिरला हाेता. दरम्यान, आता बजरंगवाडीतील सराईत अभिषेक जाधव, राहुल ब्राह्मणे, नवाज खान व त्याच्या इतर ५ ते ६ साथीदारांसह खडकाळीतील तडिपार जुबिन मोहमंद सैय्यद, मतीन रुबाब शेख, जफर शेख, युसुफ शेख, रजा व इतर ६ ते ७ संशयित हे शहरात एमडी ड्रग्ज व गांज्या विक्री करत असल्याचे समाेर येते आहे.
हे देखील वाचा : Nashik News : लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानावर – पालकमंत्री भुसे
तर (दि. १६) राेजी दुपारी दीड वाजता संशयित ब्राह्मणे हा पुणे राेडवरुन इस्काॅन मंदिराकडे जाणाऱ्या राेडगत एमडी ड्रग्ज (MD Drugs) विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती हवालदार संजय ताजणे यांना कळाली. त्यांनीे एनडीपीएसचे वरिष्ठ निरीक्षक जयराम पायगुडे, सुशिला काेल्हे यांना कळविली. त्यानुसार सहायक निरीक्षक हेमंत नागरे यांच्यासह पथकाने सापळा रचून ब्राह्मणेस ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ९५ हजारांचे १९ ग्रॅम एमडी ड्रग्ज, पाेर्टेबल वजनकाटा, रिकाम्या प्लास्टिक पिशव्या असा मुद्देमाल जप्त केला.
दरम्यान, ब्राह्मणेचे साथीदार काेण आहेत, त्याने ड्रग्ज कुठून आणले? काेणला विक्री करणार हाेता, याचा तपास सुरु केला आहे. तर, प्रकरणाचे धागेदाेरे थेट भिवंडी, वाशी, मुंबईपर्यंत जुळत असल्याचे प्रथमदर्शनी समाेर आले आहे. याबाबत मुंबईनाका पाेलीस ठाण्यात (Mumbai Naka Police Station) गुन्हा नाेंद झाला असून तपास एपीआय नागरे करत आहेत. गुन्हे विभागाचे पाेलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या सूचनेने एनडीपीएस पथकाने कारवाई केली.
दाेन्ही टाेळ्या एमडी विक्रीत!
जुबीन आणि त्याच्या टाेळीचे बजरंगवाडीतील जाधव, ब्राह्मणे टाेळीशी खटके उडाले आहेत. वर्चस्व गाजविण्यासाठी व खुन्नस काढण्यासाठी त्यांनी तेव्हा दंगल माजविली हाेती. समाेरच्या गटातील ब्राह्मणे व जाधव टाेळीला शह देण्यासाठी एकमेकांवर हा हल्ला केला हाेता. जुबीन सैय्यद, तसेच ब्राह्मणे, जाधव व इतर साथीदार, काही अल्पवयीन मुले एमडी ड्रग्ज व अन्य अमली पदार्थांची तस्करी व विक्री करतात, असे निष्पन्न झाले आहे. या रॅकेटमध्ये अनेक झाेपडपट्टीतील अल्पवयीन मुलांसह तरुणांची साखळी कार्यरत असून त्यांच्यामार्फत जुबीन अन्य टाेळ्या अमली पदार्थांचा पुरवठा करत असल्याचे अधाेरेखित झाले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा