नाशिक | प्रतिनिधी | Nashik
आडगाव (Adgaon) येथील नर्सिंग कॉलेजमधील युवतीला (Gril) हॉटेलवर नेऊन तिचा खून (Murder) केल्याप्रकरणी नराधमास नाशिक जिल्हा न्यायालयाने (Nashik District Court) जन्मठेपेची शिक्षा (Life Imprisonment) व १२ हजारांचा दंड ठोठावला आहे. ही घटना जानेवारी २०२१ मध्ये घडली होती.
हे देखील वाचा : Nashik Suicide News : शहरात तिघांनी संपविले जीवन
याबाबत अधिक माहिती अशी की, तन्मय प्रवीण धानवा (२१, रा. मासवन, ता. जि. पालघर) असे आरोपीचे नाव आहे. सुरेश सोमर्या भोईर (रा. कल्लाले, मान बोईसर, जि. ठाणे) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची मुलगी अर्चना भोईर ही आडगाव नर्सिंग महाविद्यालयात (College) असताना, १२ जानेवारी २०२१ रोजी आरोपी तन्मय हा तिच्या महाविद्यालयात गेला आणि तिला सोबत येण्यास सांगितले. तिने नकार दिला असता, त्याने तिला मारले. त्यामुळे वाद नको म्हणून ती त्याच्यासोबत महाविद्यालयातून बाहेर पडली. दोघे सिटी पॅलेस हॉटेलमध्ये थांबले असता, अर्चना दुसऱ्याशी फोनवर बोलते या कारणावरून आरोपी तन्मय याने तिचा गळा दाबला आणि तिचे डोके भिंतींवर आपटून तिचा खून केला होता.
हे देखील वाचा : Nashik News : पोलिस व प्रशासनाने संवेदनशीलपणे परिस्थिती हाताळल्याने पालकमंत्री भुसेंकडून कौतुक
दरम्यान, याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात (Sarkarwada Police) खूनाचा गुन्हा दाखल करीत त्यास अटक (Arrested) केली होती. तत्कालिन पोलीस निरीक्षक रियाज शेख यांनी गुन्ह्याचा तपास करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. खटल्याचे कामकाज जिल्हा सत्र न्यायधीश एन. व्ही. जिवने यांच्यासमोर चालले. परिस्थितीजन्य पुराव्यांनी आरोप सिद्ध झाले. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता डॉ. सुधीर कोतवाल यांनी कामकाज पाहिले. तर पैरवी अधिकारी म्हणून हवालदार माणिक पवार, के. के. गायकवाड, गणेश चिखले यांनी पाठपुरावा केला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा