Sunday, September 8, 2024
Homeक्राईमNashik Crime News : मेजर गुन्हे उकलीविनाच; खून प्रकरणातील संशयित अकरा दिवसांपासून...

Nashik Crime News : मेजर गुन्हे उकलीविनाच; खून प्रकरणातील संशयित अकरा दिवसांपासून फरार

एमडी ड्रग्जची लिंक लागेना

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील विविध पाेलीस ठाणे (Police Station) प्रभारींच्या अर्थकारणासह अन्य गंभीर तक्रारी आयुक्तालयाच्या दारी पाेहाेचल्याने अखेर अनेक पाेलीस निरीक्षकांची गच्छंती पाेलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी केली. हे झाले असतानाच पूर्वीचे अनेक गंभीर गुन्हे दाखल असूनही त्यांच्या तपासास प्रगती मिळत नसल्याचे समाेर आले आहे.

- Advertisement -

म्हसरुळ पाेलिसांच्या (Mahasrul Police) हद्दीत घडलेल्या कुसुम एकबाेटे हत्या प्रकरणातील (Murder Case) संशयित मारेकरी गेल्या अकरा दिवसांपासून पसार आहे. तर, गुन्हेशाखेने महिनाभरापूर्वी केलेल्या एक नव्हे तर दाेन एमडी ड्रग्ज (MD Drugs) जप्त केल्याच्या गुन्ह्यांचा तपास मुंबई नाका व सरकारवाडा पाेलिसांकडून थंड बासनात बांधून ठेवण्यात आला आहे. साेबतच पुण्यातून नाशकात (Nashik) झालेल्या गांजा तस्करीतील मास्टरमाईंड महिलाही मुंबई नाका पाेलिसांना धुंडाळण्यात अपयश आले आहे. त्यामुळे गुन्हे दाखल असूनही त्याचा पुढील तपास हाेत नसल्याचे अधाेरेखित हाेत आहे. 

हे देखील वाचा : Nashik News : हुल्लडबाजांवर कारवाई; चार ठिकाणी नाकाबंदी

म्हसरुळ हद्दीतील गुलमाेहाेर नगरातील स्वामी समर्थ केंद्रामागील राधाकृष्ण निवासात ८० वर्षीय कुसुम सुरेश एकबाेटे यांची १० जुलै राेजी सकाळी दहा वाजता त्यांच्याच साेयायटीत राहणाऱ्या २२ वर्षीय बेराेजगार संशयिताने स्वत:च्या घरातील धारदाक विळ्याने मानेवर सपासप वार करुन निर्घृण हत्या केली. यानंतर संशयित विळा कुसुम यांच्या मानेत खुपसून पळून गेला. ताे पळून गेल्यावर गुन्हेशाखा व म्हसरुळ पाेलिसांची पाच पथके रवाना करण्यात आली.

संशयित हरसूल, पेठ, व सुरगाणा भागातील वाडी, पाडे व वस्त्यांवर असल्याची माहिती मिळताच कागी पथके तेथे पाेहाेचली. पण त्यांना संशयित सापडला नाही. विशेष म्हणजे संशयित वास्तव्याचे लाेकेशन वारंवार बदलत असल्याने त्याचा ठिकाणा सापडलेला नाही. त्यातच त्याच्या मागावर एक पथक याच भागात मुक्कामी देखिल ठेवण्यात आले. मात्र तरीही ताे हाती आलेला नाही. आता पाेलिसांनी (Police) आधुनिक तपासासह पारंपरिक तपासावर भर देत त्याचा शाेध सुरु केला असून ताे (दि. २२) पसार हाेऊन १२ दिवसांचा कालावधी लाेटणार आहे.

हे देखील वाचा : Budget Session 2024 : अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी PM मोदी काय म्हणाले?

तसेच २१ व २२ जून राेजी गुन्हेशाखेच्या विशेष पथकांनी रविवार कारंज्या व पखाल राेड येथे लागाेपाठ दाेन कारवाया करुन एकूण साडेचार लाख रुपयांचे ९० ग्रॅम एमडी अर्थात मेफेड्राेन हस्तगत केले हाेते. यात तिघांना पकडून सरकारवाडा व मुंबई नाका पाेलिसांत एमडीपीएस कायद्यान्वये गुन्हे दाखल केले. तर, गुन्हेशाखा व विशेष पथकांच्या कारवायांचा आलेख वाढताच असावा, यासाठी आयुक्त संदीप कर्णिक यांनी या पथकांना कारवाईचे अधिकार देत त्यानंतर या गुन्ह्यांचा तपास करण्याचे निर्देश संबंधित पाेलिस ठाण्यांना दिले. मात्र, सरकारवाडा व मुंबईनाका पाेलिस ठाणे (Mumbai Naka Police Station) गुन्हे उकलीत कमालीचे मागे पडले असून एमडीच्या दाेन्ही गुन्ह्यांतील साखळी, मुख्य डिलर व इतर संशयितांचा तपास थंडावलेलाच आहे.

ते दाेघे सूत्रधार पसारच

मुंबई नाका पाेलिसांनी ८ जुलै राेजी दिपालीनगर भागात गस्ती दरम्यान, संशयास्पदरित्या थांबलेल्या उबर कारची तपासणी केली. तेव्हा कारमध्ये ४ लाख रुपयांचा १९ किलाे गांज्या आढळला हाेता. त्यानुसार उबर कारचालक किरण धुमाळ यास अटक केली. मात्र, संशयित गांजा तस्कर महिला पूजा संजय मिसाळ व तिचा साथीदाराने उबर कार ऑनलाईन बूक करुन गांजाची वाहतूक केली. तर कारवाई पूर्वी दाेघे फरार झाले. त्यामुळे या प्रकरणातील सूत्रधार मिसाळ ही गेल्या १५ दिवसांपासून पसार आहे. तिने हा गांजा कुठून आणला, नाशिकमध्ये कुणाला देण्यास आणला हाेता का? हे मुद्दे तपासात अद्याप मुंबईनाका पाेलिसांना समाेर आणता आलेले नाही. 

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या