Sunday, August 30, 2026
Homeक्राईमNashik Crime News : गुन्हेगारांना 'इन्स्टाग्राम कॉलिंग'चा आधार; हर्षद पाटणकरच्या 'मेसेज'वरूनच साथीदारांकडून...

Nashik Crime News : गुन्हेगारांना ‘इन्स्टाग्राम कॉलिंग’चा आधार; हर्षद पाटणकरच्या ‘मेसेज’वरूनच साथीदारांकडून पूर्वश्रमीच्या मित्राला ऑनलाइन धमकी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

पारंपरिक मोबाईल नेटवर्कवर पोलिसांची बारीक नजर (कॉल ट्रेसिंग) असल्याने, पोलिसांना चकवा देण्यासाठी सराईत गुन्हेगारांनी (Criminal) आता ‘इन्स्टाग्राम’सारख्या सोशल मीडिया ॲप्सच्या (Social Media Apps) कॉलिंगचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे. असाच एक प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात (Nashik Road Jail) बंदिस्त असलेला कुख्यात गुंड हर्षद पाटणकर (Harshad Patankar) याच्या सांगण्यावरून त्याच्या साथीदारांनी थेट ‘इन्स्टाग्राम कॉल’चा वापर करून पूर्वश्रमीच्या मित्राला दाखल फिर्याद मागे घेण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे समाेर आले आहे.

​इन्स्टाग्रामवरून थेट धमकी

३१ जुलै २०२६ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास संशयित तन्मय कलकुंडे याने रणमाळेला फोन करून “भाईचा मेसेज आहे, केस मागे घे, नाहीतर मारून टाकू,” असा दम भरला. यानंतर अवघ्या काही वेळातच दुसरा संशयित आदित्य नामदेव लष्करे याने त्याच्या ‘aadu_15’ या इन्स्टाग्राम आयडीवरून रणमाळेला थेट कॉल केला. “तुला तन्मयने सांगितले ते समजत नाही का… आम्ही तर जेलमध्ये जाऊच, पण तुला मारून टाकू!” अशी थेट धमकी दिली.;या डिजिटल धमकीमुळे भयभीत रणमाळेने रविवारी (दि. २)) पंचवटी पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३५१(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : केस मागे घे, नाहीतर मारून टाकू; ​नाशिकरोड कारागृहातूनच पाटणकर टोळीच्या सुपाऱ्या

ट्रॅकिंग टाळण्यासाठी नवीन क्लृप्ती

सामान्य सिमकार्डवरून कॉल केल्यास पोलिसांना (Police) टाॅवर लोकेशन, सीडीआर आणि कॉल रेकॉर्डिंग सहज उपलब्ध होते. मात्र, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम कॉलिंगचा आयपी ॲड्रेस ट्रॅक करणे आणि त्याचा तांत्रिक पुरावा गोळा करणे कठीण जाते. याच तांत्रिक त्रुटीचा फायदा गुन्हेगार घेत आहेत. जेलमधील गुंडांचे मेसेज बाहेर आणून अशा सोशल मीडिया आयडीवरून धमक्या देण्याचे प्रमाण वाढल्याने पोलिस तपासासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

मुद्दे

-​जेलमधून नेटवर्क सुरूच : चार महिन्यांपासून नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात गजाआड असलेला पाटणकर बाहेर टोळीला कसे आदेश देतोय, यावर प्रश्नचिन्ह.
-मित्र बनले शत्रू : फिर्यादी निलेश रणमाळे हा पूर्वी पाटणकर टोळीचाच सदस्य होता, मात्र वर्चस्ववादातून त्यांच्यात हा वाद सुरू झाला.
​गुन्हेगारी पार्श्वभूमी : हर्षद पाटणकर आणि त्याच्या टोळीवर शहरात ९ पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

ताज्या बातम्या

एकनाथ शिंदेंच्या भाषणाला सुरुवात होताच परभणीत ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा...

0
परभणी । Parbhani शेतकरी, युवक आणि मराठा आरक्षण या मुद्द्यांमुळे चर्चेत असलेल्या परभणीतील शेतकरी व युवा संवाद मेळाव्यात रविवारी एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री...