Tuesday, April 21, 2026
HomeनाशिकTrimbakeshwar Darshan Scam : बँक खात्यात एक कोटी रुपये! दोघांच्या कोठडीत चार...

Trimbakeshwar Darshan Scam : बँक खात्यात एक कोटी रुपये! दोघांच्या कोठडीत चार दिवसांची वाढ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या ‘व्हीआयपी दर्शन’ घोटाळा (Trimbakeshwar Darshan Scam) प्रकरणातील मुख्य संशयित आणि देवस्थानचे विश्वस्त संशयित पुरुषोत्तम मधुकर कडलगच्या बँक खात्यांत (Bank Account) मागील एका वर्षात एक कोटी १३ लाख ५८ हजार रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या खुलाशानंतर नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. व्ही. लाड यांनी सोमवारी (दि. २०) संशयित कडलगसह गोटीराम पेहरे या दोघांच्या पोलीस कोठडीत २४ एप्रिलपर्यंत चार दिवसांची वाढ केली आहे.

- Advertisement -

कडलगच्या बँक खात्यात वेगवेगळ्या खात्यांतून ही रक्कम जमा झाली आहे. काही जणांना रोख रक्कम देऊन त्यांच्याकडून स्वतःच्या बँक खात्यावर पैसे घेतल्याचेही तपासात समोर आले आहे. या व्यवहारांबाबत कडलगकडे समाधानकारक स्पष्टीकरण नाही, असा युक्तिवाद सरकारी पक्षाच्या सहायक संचालक किरण बेंडभर व सहायक सरकारी अभियोक्ता कांचन सोनवणे यांनी केला. तर आधीच एसआयटी पथकाने पोलीस कोठडीत (Police Custody) आवश्यक तपास केला आहे. त्यामुळे न्यायालयीन कोठडीची मागणी कडलगचे वकील राहुल कासलीवाल यांनी केली.

तर पैसे घेऊन भाविकांना (Devotees) दर्शन करून देणारे एजंट आणि विश्वस्त कडलग यांच्यात अनेक वेळा फोनवरून संभाषण झाल्याचे तपासात आढळले आहे. ही साखळी शोधण्यासाठी पोलिसांना वाढीव कोठडीची गरज असल्याची मागणी पोलीस निरीक्षक तथा एसआयटीप्रमुख महेश कुलकर्णी यांनी केली. पोलीस कोठडीदरम्यान एसआयटीने आतापर्यंत दोनशेपेक्षा जास्त भाविकांकडे चौकशी केली आहे. त्यापैकी अनेकांनी एजंटमार्फत पैसे देऊन दर्शन घेतल्याची कबुली दिली. विशेष म्हणजे, परराज्यातील भाविकांनीही पोलिसांशी संपर्क साधला असून, त्यांच्यासमोर संशयितांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

मालमत्तेचा शोध

फसवणुकीच्या (Fraud) या पैशातून संशयितांनी कोणती स्थावर किंवा जंगम मालमत्ता खरेदी केली आहे का, याचा शोध आता एसआयटी घेत असून बँक खात्यातील एक कोटींचे व्यवहार आणि रजिस्टरमधील संशयास्पद नोंदी पाहता या पैशांचा मार्ग आता शोधला जाणार आहे.

चार दिवसांत ७१ जणांना दर्शन

उत्तर गेटवरील एन्ट्री रजिस्टरनुसार, केवळ चार दिवसांत (दि. ३ ते ११ एप्रिल) साधारणतः ७१ भाविकांना कडलगच्या सांगण्यावरून मंदिरात प्रवेश देण्यात आल्याचे एसआयटीने न्यायालयाला सांगितले. या रजिस्टरवर संबंधित भाविकांना कडलगांचे नातेवाईक किंवा पाहुणे दाखवण्यात आले, मात्र प्रत्यक्ष चौकशीत कडलग यांनी या भाविकांना ओळखत नसल्याचे सांगून आरोप फेटाळले आहेत.

ताज्या बातम्या

सुनेत्रा

Sunetra Pawar: मी एका संघर्षयोद्ध्याची सहचारिणी, येशूबाई, अहिल्याबाई जशा लढल्या, त्याप्रमाणे...

0
बारामती | Baramatiबारामती पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आयोजित सांगता सभेला राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संबोधन केले. यावेळी त्यांनी बारामतीकरांना भावनिक साद घालत विक्रमी मतदान करत...