नाशिक | प्रतिनिधी | Nashik
थंडीच्या दिवसांत रात्रीच्या वेळी नागरिक घराबाहेर पडत नसल्याने चोरट्यांनी (Thieves) त्याचा फायदा घेत मंदिरातील दानपेटीवर लक्ष केंद्रीत केले आहे. आडगाव शिवारातील (Adgaon Shivar) शरयू पार्क येथील गणेश कॉलनीतील गणपती, महालक्ष्मी व पवनपुत्र हनुमान मंदिरातील शनिवार (दि. ३०) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास दानपेटी चोरट्यांनी फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आडगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत.
हे देखील वाचा : Nashik Fraud : एलआयसीला दोन कोटींचा गंडा
मुंबई-आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra Highway) आडगाव शिवारातील शरयू पार्क येथील गणेश कॉलनीतील गणपती, महालक्ष्मी व पवनपुत्र हनुमान मंदिर आहे. शनिवार (दि. ३०) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी या मंदिरांना लक्ष करीत येथील दानपेट्या फोडल्याची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यानी या दानपेट्यातील रोख रक्कम चोरून नेली आहे.
हे देखील वाचा : World AIDS Day : नाशिक जिल्ह्याची एड्समुक्तीकडे वाटचाल
सदर बाब ही सकाळी मंदिरात पूजा करण्यासाठी गेले असता लक्षात आली. स्थानिक नागरिकांनी आडगाव पोलीस ठाण्यास (Adgaon Police Station) संपर्क करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. या भागात पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून (Citizen) जोर धरू लागली आहे.
हे देखील वाचा : Nashik News : खेरवाडी शिवारात रेल्वे रुळावर आढळला विचित्र अवस्थेत युवक-युवतीचा मृतदेह
नाशिक – शहरात मोठ्या प्रमाणात थंडी असल्यामुळे थंडीचा फायदा घेऊन मध्यरात्रीनंतर चोरीचे प्रमाण वाढत आहेत. पोलिसांनी गस्त पथक वाढवावे, चोरांचा मुसक्या आवळल्या पाहिजेत.
सुनील जाधव, महानगर संघटक, शिवसेना (उबाठा)