Tuesday, February 3, 2026
Homeक्राईमNashik Crime News : तरुणाई गुंतली मांजा विक्रीत; तिघे ताब्यात

Nashik Crime News : तरुणाई गुंतली मांजा विक्रीत; तिघे ताब्यात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शिक्षण (Education) बाजूला सारुन शहरातील काही तरुणाई (Youth) घातक ‘नायलॉन’ मांजाच्या (Nylon Manja) विक्रीत गुंतल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मकरसंक्रांतीला महिनाभराचा अवधी बाकी असतानाचा, शहर व जिल्ह्यांत घातक मांजा विक्रीसह वापर करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होत असले तरी, अनेकांनी सहा महिन्यांपूर्वीच नायलॉनची होलसेल खरेदी करुन ‘साठा दडविल्याचे समोर येत आहे.

- Advertisement -

शहर पोलिसांनी (City Police) नायलॉन मांजाची विक्री व वापरावर कडक निर्बंध लागू केले असून, याच मांजामुळे गेल्या काही वर्षांत अनेक दुचाकीस्वारांसह महिला व मुलांना जीव गमवावा लागला आहे. मांजाचा हाच धोका ओळखून शहर पोलिसांनी मागील वर्षीप्रमाणेच नायलॉन मांजावर बंदी घातली आहे. तसेच, मांजाची विक्री आणि वापर करणाऱ्यांची साखळी शोधून त्यांच्यावर ‘मोक्का’ अन्वये कारवाई करणार असल्याची भूमिका पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मांडली आहे. दरम्यान, नायलॉन संदभनि कठोर कारवाईचे धोरण शहर पोलिसांनी अमलात आणले असतानाच, गुरुवारी अंबड आणि सातपूर पोलिसांनी (Satpur Police) केलेल्या कारवाईत अठरा वयोगटातील तिघे संशयित तरुण मांजाची चोरीछुप्या पद्धतीने विक्री करत असल्याचे आढळले आहे.

YouTube video player

त्यानुसार, प्रणव प्रकाश पाटील (मूळ रा. सायगाव रोड, पिलखोड, ता. चाळीसगाव, जि. जळगाव, सध्या रा. अनंतकृपा, अशोकनगर, सातपूर), गणेश संजय महाजन (रा. फुलेनगर, पेठरोड, पंचवटी) आणि जयेश अनिल दिवे (रा. पाण्याच्या टाकीजवळ, आठ हजार खोल्या, सातपूर कॉलनी) यांच्यावर पर्यावरण संरक्षण कायदा कलम ५, १५, बीएनएस कलम २२३, २९२, २९३ व मपोका १३५ प्रमाणे गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंदविण्यात आले आहे. तिघे शिक्षण घेतात. मात्र, त्यांनी सध्या नायलॉन विक्रीत जम बसविल्याचे कारवाईतून उघड झाले आहे.अशाच स्वरुपाच्या कारवाईत वाढ केली जाणार असून वापर करणाऱ्या अल्पवयीनांसह त्यांच्या आई वडिलांवर देखील कारवाई (Action) केली जाणार आहे.

३८ हजारांचा मांजा जप्त

प्रणव आणि गणेश यांनी सिडकोतील पाटीलनगर गार्डनजवळ गुरुवारी रात्री आठ वाजता ३० हजारांचे मांजाचे तीस गट्ट बाळगून विक्रीचा प्रयत्न केला. तर, जयेश यानेही सातपूर कॉलनीत दुपारी तीन वाजता आठ हजारांचे आठ गड्डू जवळ बाळगून विक्री करण्याचा प्रयत्न करीत पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केले.

ठळक मुद्दे

  • जनजागृती, कारवाया करूनही अनेकांची मांजाकडे कल
  • मागील वर्षीय मांजा विक्री करणारे रडारवर
  • मांजाची चोरून विक्री कणाऱ्यांचे नाव, पत्ते देण्याचे आवाहन
  • नावे आणि ठिकाण सांगणाऱ्यांची ओळख गोपनीय राहणार
  • सीपी व्हॉट्सअॅपवर माहिती द्यावी, काही तासांत कारवाई
  • बेकायदेशीर कृत्यात सहभागी न होण्याचे आवाहन
  • आढळल्यास तडीपारी, जेलवारी व मोक्का कारवाई

ताज्या बातम्या

Nashik News : वकिलांचे न्यायाधीशांवर आक्षेप! कामकाजापासून राहिले अलिप्त

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक वकील संघाने (Nashik Lawyers Association) जिल्हा न्यायालयातील पाच न्यायाधीशांच्या मनमानीसह कार्यपद्धतीवर आक्षेप घेत सोमवारी (दि. २) एकदिवसीय कामबंद आंदोलन...