Wednesday, February 4, 2026
Homeक्राईमNashik Crime News : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

Nashik Crime News : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

लग्नाचे (Marriage) आमिष दाखवून तब्बल सहा वर्षे लैंगिक अत्याचार (Rape) करत महिलेला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी तिघांविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात (Indiranagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisement -

याबाबत महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आकाश प्रभाकर चामलाटे, दीपाली दिनेश सहारे व दिनेश सहारे (सर्व रा. वडगाव, ता. जि. अमरावती) यांनी महिलेस लग्न करण्याचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर (२०१९ ते दि. ३ नोव्हेंबर २०२५) सहा वर्षांच्या कालावधीत महिलेशी वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. महिलेने लग्नाबाबत विचारणा केली असता तिला उडवाउडवीची उत्तरे मिळत होती.

YouTube video player

दरम्यान, संशयितांनी (Suspected) महिलेशी लग्न न करता तिला जातीवाचक शिवीगाळ करून मारण्यासाठी अंगावर धावून आले. हा प्रकार गेल्या सहा वर्षांपासून गौळाणे रोड परिसरात घडला. फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आल्यानंतर तिने इंदिरानगर पोलीस ठाण्यात बलात्काराची फिर्याद दिली असून, तीनही संशयितांविरोधात अॅट्रोसिटीसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी करत आहेत.

ताज्या बातम्या