Tuesday, February 3, 2026
Homeक्राईमNashik Crime : 'त्या' स्वाक्षरी माझ्या नाहीत! 'शालार्थ' घोटाळाप्रकरणी उपासनीने आराेप फेटाळले

Nashik Crime : ‘त्या’ स्वाक्षरी माझ्या नाहीत! ‘शालार्थ’ घोटाळाप्रकरणी उपासनीने आराेप फेटाळले

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

तब्बल एक हजारहून अधिक बनावट शालार्थ आयडी (Shalarth ID Scam) तयार करुन ते तीन ते पाच लाखांत विक्री केल्याच्या आराेपात अटकेत (Arrested) असलेला माजी शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी याने शालार्थ प्रस्तावांवरील सह्या मी केल्याच नाहीत, असा दावा केला आहे. दरम्यान, या प्रकरणात अटकेत असलेल्या दत्तात्रय पाटील (वय ६५) याची शनिवारी(दि. ६) न्यायालयाच्या आदेशाने मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. 

- Advertisement -

शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) दाखल गुन्ह्यात काही दिवसांपूर्वीच पोलीस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक रामदास शेळके आणि पथकाने अंमळनेर येथून संशयित मनोज रामचंद्र पाटील (रा. नवलनगर, धुळे), निलेश निंबा पाटील (रा. चिंचोली, ता. चोपडा) या दोघांसह अविनाश पाटील, दत्तात्रय पाटील यांना अटक केली हाेती. त्याचदरम्यान, नाशिकरोड पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी वरील गुन्ह्यातील संशयित शरद शिंदे, किरण पाटील आणि अविनाश पाटील यांच्याशी संगनमत करुन गुन्ह्याच्या तपासी अधिकाऱ्याच्या अपरोक्ष पुराव्यांत फेरफार करुन छेडछाड केली हाेती.

YouTube video player

दरम्यान, ही धक्कादायक बाब उघड झाल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी गिरी यांना निलंबित केले आहे उपासनीस गुरुवारी(दि.४) अटक (Arrested) करण्यात आल्यावर न्यायालयाच्या आदेशाने ताे सध्या इओडब्लूच्या काेठडीत आहे. त्याच्याकडे सखाेल तपास सुरु असून त्याने केवळ एक आयडी मंजूर करण्यासाठी ‘वैयक्तिक’ स्तरावर तीन ते पाच लाख रुपयांचा ‘रेट’ ठरविला हाेता, असे आर्थिक गुन्हेशाखेच्या तपासात समाेर येत आहे. त्याने जवळपास एक हजारहून अधिक बनावट आयडी विकल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

पुन्हा काेठडी मिळणार? 

उपासनी हा उत्तर महाराष्ट्रातील या घोटाळ्याचा ‘मास्टरमाइंड’ असल्याचे उघड हाेत असून त्याने सेवेत असताना व निवृत्तीनंतरही सुमारे एक हजार आयडींच्या प्रस्तावांवर सह्या करीत जुन्या दिनांकाच्या नियुक्ती पत्रांद्वारे ‘आयडी’ मंजूर केल्याचे उघड हाेत आहे. दरम्यान, प्रस्तावांवरील सह्या मी केल्या नसून कुणीतरी बनावच पद्धतीने केल्याचा दावा त्याने पाेलिसांकडे केला आहे. दरम्यान, त्याच्या पाेलीस काेठडीची मुदत साेमवारी (दि. ८) संपत असल्याने त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. तपास बाकी असून पुरावे संकलित करण्यासाठी तपास पथकाचे वरिष्ठ निरीक्षक अतुलकुमार डहाके हे वाढीव पाेलीस काेठडीची मागणी करणार असल्याचे समजते. 

ताज्या बातम्या

Praful Patel : प्रफुल पटेलांनी घेतली पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांची...

0
दिल्ली । Delhi महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल...