Sunday, April 20, 2025
Homeक्राईमNashik Crime : हळदीच्या कार्यक्रमात नाचण्यावरून वाद; धारदार शस्त्राने वार करून एकाचा...

Nashik Crime : हळदीच्या कार्यक्रमात नाचण्यावरून वाद; धारदार शस्त्राने वार करून एकाचा खून

पिंपळगाव बसवंत | वार्ताहर | Pimpalgaon Baswant

जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) येथील जोपुळ रोड बाजार समिती (Jopul Road Market Committee) समोर काल (शनिवारी) रात्रीच्या सुमारास लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात नाचण्यावरून वाद झाल्याने एकाचा खून (Murder) झाल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, ‘रवी सोमनाथ गुंबाडे (वय २३) रा. चिंचखेड ता. दिडोरी असे खून झालेल्या युवकाचे (Youth) नाव आहे. काल (शनिवारी) रात्री अकराच्या सुमारास लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम ( Program) सुरु होता. या कार्यक्रमात नाचण्यास नकार दिल्याने बाचाबाची झाली आणि त्याचे रूपांतर नंतर थेट हत्येमध्ये झाले. त्यात गुंबाडे यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी (Police) हेमंत परशुराम जाधव, जनार्दन ज्ञानेश्वर गांगुर्डे, रमेश मुरलीधर शेखरे सर्व राहणार अंबिका नगर, पिंपळगाव बसवंत यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच पुढील तपास पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री, पो उपविभागीय अधिकारी वासुदेव देसले, पो.नि. रविंद्र जाधव करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

राज ठाकरेंसमोर कोणत्याही अटी-शर्ती नाहीत; ठाकरे बंधुंच्या मनोमिलनावर राऊतांचे मोठे विधान

0
मुंबई । Mumbai गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठी अस्मिता आणि भाषेच्या मुद्द्यावर राजकारण तापले आहे. पहिलीपासून हिंदी अनिवार्य करण्याच्या निर्णयाला विरोध करत मनसेने आक्रमक भूमिका...