नाशिक | Nashik
आडगाव पोलिसांच्या (Adgaon Police) हद्दीतील संभाजीनगर रोडवरील (Sambhajinagar Road) विंचूरगवळी येथे तुळजापूरातील विस्थापित कुटुंबात भांडण होऊन एका नातलगाचा खून (Murder) झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भाल्या पवार (वय ४५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो आपल्या पत्नी समवेत शुक्रवार (दि.१७) रोजी गुजरात (Gujarat) येथून नातेवाईकांकडे विंचूरगवळी येथे कामानिमित्त आले होते. यावेळी त्यांचे आपापसात वाद होऊन या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. त्यानंतर पवार याचा धारदार शस्त्राने संशयिताने खून केला .
दरम्यान, या घटनेनंतर काही नागरिकांनी तात्काळ पवार यास तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात (District Government Hospital) दाखल केले. यानंतर डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषित केले. या घटनेची माहिती आडगाव पोलिसांना मिळाल्यानंतर याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मध्यरात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तर पुढील अधिक तपास आडगाव पोलिस करीत आहेत.