नाशिक | Nashik
भिवंडीतील हॉस्पिटलमध्ये लॅबसाठी जागा देण्याचे आमिष दाखवून संशयितांनी (Suspected) एकाची ४० लाखांची फसवणूक (Fraud) केली आहे. डॉ. नवलकिशोर अण्णासाहेब शिंदे, वैशाली दिनेश डोळे, शितल नवलकिशोर शिंदे, रुपा संदीप राव, डॉ. दिनेश सुखदेव डोळे अशी संशयितांची नावे आहेत.
सुमीत हरेश क्षीरसागर (३४, रा. मुक्ताई बंगला, महात्मानगर) यांच्या फिर्यादीनुसार, संशयितांनी भिंवडी (Bhiwandi) येथील मालविका हॉस्पिकेअरच्या ऑरेंज हॉस्पिटल (Hospital) येथे लॅब चालविण्यासाठी जागा देण्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला.
दरम्यान,वेळोवेळी त्यांच्याकडून सप्टेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२४ यादरम्यान ४० लाख रुपये घेतले. परंतु लॅबसाठी जागा न देता रक्कमेचा अपहार करीत त्यांची फसवणूक केली. गंगापूर पोलिसात (Gangapur Police) गुन्हा दाखल आहे.
बस प्रवासात आठ लाखांचा ऐवज चोरला
नाशिक | Nashik
मेळा बसस्थानक (Mela Bus Stand) ते त्रिमूर्ती चौक या दरम्यान रिक्षा प्रवासामध्ये अज्ञात सहप्रवाशाने बॅगेतील ८ लाख १५ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. विमल राजाराम मत्सागर (६८, रा. पाटील नगर,त्रिमूर्ती चौक, सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या सोमवारी (ता.६) मत्सागर दाम्पत्य हे रत्नागिरीहून मेळा बसस्थानकावर उतरले व त्रिमूर्ती चौकाच्या दिशेने दुपारी दोनच्या सुमारास निघाले.
रिक्षामध्ये चालकासह दोन अज्ञात प्रवासी व मत्सागर दाम्पत्य होते. या प्रवासादरम्यान सहप्रवाशांनी त्यांच्या बॅगेतील १० हजारांच्या रोकडसह सोन्याचे दागदागिने (Gold jewelry) असा ८ लाख १५ हजारांचा ऐवज चोरुन नेला, असे फिर्यादीत नमूद आहे. अंबड पोलिसात रिक्षाचालकासह अज्ञात प्रवाशांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल आहे.




