Wednesday, January 7, 2026
HomeनाशिकNashik Crime : शेतकऱ्यांना फसवणारा व्यापारी ताब्यात; दोन संशयित फरार

Nashik Crime : शेतकऱ्यांना फसवणारा व्यापारी ताब्यात; दोन संशयित फरार

ओझर पोलिसांची कामगिरी

ओझर | वार्ताहर | Ozer

निफाड तालुक्यातील (Niphad Taluka) ५४ द्राक्ष उत्पादकांचे सुमारे १ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक (Fraud) करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या ओझर पोलिसांनी (Ozer Police) मुसक्या आवळल्या. हा व्यापारी दोन वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत होता. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार ओझर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक निलिमा डोळस आणि सहकाऱ्यांनी (Colleagues) उगाव (ता. निफाड) येथून बबलू गफार शेख याला अटक केली आहे. गुन्ह्यातील इतर दोन आरोपी अजूनही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

- Advertisement -

याबाबतची माहिती अशी की, आलम आमीन बागवान (रा. बागवान गल्ली, वरचे चांदवड), वसीम उर्फ फिरोज युसूफ शेख
(रा. उगाव), कलीम बागवान (रा. गांधीनगर, कोपरगाव), बबलू गफार शेख (रा.उगाव) यांनी संगनमताने निफाड तालुक्यातील सुकेणा, वनसगाव, ब्राह्मणगाव, शिवडी, सावरगाव, नांदुर्डी पालखेड आदी गावातील विविध
शेतकऱ्यांकडून मार्च २०२३ मध्ये द्राक्षबागेत जावून द्राक्षमालाचा व्यवहार केला होता.

YouTube video player

सदर व्यवहारापोटी शेतकऱ्यांना थोडे बहुत पैसे रोख देत त्यांचा विश्वास संपादन करत उर्वरित रक्कमेचे मुख्य संशयित (Suspected) आलम आमीन बागवान याने धनादेश दिले होते. द्राक्षबागेचा खुडा झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी धनादेश बँकेत वटवण्यासाठी टाकले असता खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक नसल्याने चेक वटला नाही. त्यानंतर शेतकऱ्यांनी संबंधित व्यापाऱ्यांशी संपर्क साधत उर्वरित पैशांची मागणी केली. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली.

आपली फसवणूक (Fraud) झाल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी या चारही व्यापाऱ्यांविरोधात ओझर पोलीस ठाण्यात (दि. २३) जून २०२३ रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच चारही व्यापारी फरार झाले होते. यातील कलीम बागवान याचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने मंजूर केला होता. इतर तीन संशयित फरार होते, यातील बबलु गफार शेख रा. उगाव) हा संशयित उगाव येथे येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना मिळाली.

दरम्यान, ओझर पोलीस ठाण्याच्या (Ozer Police Station) सहाय्यक पोलीस निरीक्षक निलिमा डोळस, जितेंद्र बागुल, राजेंद्र डंबाळे, भास्कर जाधव यांच्या पथकाने उगाव येथून त्याच्या मुसक्या आवळल्या. मुख्य संशयित आलम बागवानचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने फेटाळल्याची माहिती तपास अधिकारी निलिमा डोळस यांनी दिली. फरार संशयित आरोपींचा शोध सुरू आहे. ओझर पोलीस निरीक्षक सुनील केदार यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलिमा डोळस अधिक तपास करीत आहे.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : फोटो मॉर्फिंगद्वारे राजकीय हल्ला; माजी नगरसेवकाची...

0
नाशिक | प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता तंत्रज्ञानाची धोकादायक जोड मिळाल्याचे सिडकोतील (Cidco) एका प्रकारातून उघड झाले आहे. एआयचा वापर करून...