Wednesday, February 4, 2026
Homeक्राईमNashik Crime : बँकेची फसवणूक करणारा संशयित चार वर्षांनंतर जाळ्यात

Nashik Crime : बँकेची फसवणूक करणारा संशयित चार वर्षांनंतर जाळ्यात

पिंपळगाव बसवंत पोलिसांनी सापळा रचत आवळल्या मुसक्या

पिंपळगाव बसवंत | प्रतिनिधी | Pimpalgaon Baswant

बनावट कागदपत्रे (Fake Document) सादर करीत १४ लाख ८७ हजार रुपयांचे शेती कर्ज घेत स्टेट बँक ऑफ इंडियाची (State Bank of India) फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी संशयित कैलास रामचंद खोडे यास तब्बल चार वर्षांनंतर अटक करण्यात पिंपळगाव पोलिसांना यश आले आहे. संशयितास शुक्रवारपर्यंत (दि. ६) पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

- Advertisement -

पिंपळगाव बसवंत पोलिसांनी (Pimpalgaon Baswant Police) दिलेल्या माहितीनुसार, संशयित कैलास खोडे याने २३ मे २०२२ रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया पिंपळगाव बसवंत शाखेतून १४ लाख ८७ हजार रुपयांचे पीक कर्ज घेतले होते. शेती कर्जथकबाकी झाल्याने बँकेने कर्ज खात्याबाबत सखोल चौकशी केली असता, संशयिताने कर्जमिळविण्यासाठी खोटे कागदपत्रे व चुकीची माहिती सादर केल्याचे लक्षात आल्यानंतर स्टेट बँकेच्याअधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित सोहन सिटी येथे ओळख लपवून राहत असल्याची माहिती पिंपळगाव पोलिसांना मिळाली.

YouTube video player

पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज निकम, हवालदार संतोष ब्राह्मणे, पोलीस नितीन गाढवे व चालक रामभाऊ वायकांडे यांनी सोहन सिटी येथे सापळा रचत संशयितास (Suspected) बेड्या ठोकल्या. याप्रकरणी पिंपळगाव पोलिस स्टेशनचे निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक पंकज निकम तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik News : पाणी व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन रखडले;...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ व जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषद (Zilla Parishad) स्तरावर कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर...