Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Crime : घरफोडी रोखण्यासाठी 'साईड ब्रान्च'; रहिवाशी क्षेत्रांत स्थानिक पोलिसांसह 'आधुनिक'...

Nashik Crime : घरफोडी रोखण्यासाठी ‘साईड ब्रान्च’; रहिवाशी क्षेत्रांत स्थानिक पोलिसांसह ‘आधुनिक’ गस्त

सुरक्षित नाशिक अंतर्गत सूचना

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दीपोत्सवाच्या सार्वत्रिक सुट्या सुरु झाल्या असून त्यांचा आनंद लुटण्यासाठी बहुतांश कुटुंबे आता गावी आणि पर्यटनासाठी जाणार आहेत. हीच संधी साधून ‘सराईत’ चोरटे परंपरेनुसार घरे ‘लक्ष्य’ करुन चोरी, घरफोडी करुन दिवाळी (Diwali) साजरी करतात. त्यामुळे या घटनांना पायबंद घालण्यासाठी शहर व जिल्हा पोलिसांनी खबरदारीच्या उपाययोजना राबविल्या आहेत.

- Advertisement -

विशेष म्हणजे शहरातील ‘साईड ब्रान्च’चे अधिकारी व अमलदार तेराही पोलीस ठाण्यांच्या मदतीला देण्यात आले असून ते विविध रहिवासी क्षेत्रांत आधुनिक ‘संयुक्त’ गस्त राबवत आहेत. दरम्यान, ‘सुरक्षित नाशिक संकल्पनेंतर्गत पोलिसांनी (Nashik Police) नागरिकांना दिवाळीसह सख्यांमध्ये आहे. दिवाळीच्या सुट्यांमध्ये अनेकजण बाहेरगावी जाण्याची योजना आखतात. गावी गेल्यावर घराची ‘राखण’ करणारा खरा पहारेकरी हा शेजारीच असतो.

YouTube video player

याच तत्त्वानुसार शहर पोलिसांनी (City Police) यंदाच्या दिवाळीनिमित्त ‘माझा शेजारी, खरा पहारेकरी’ या उपक्रमावर जोर दिला आहे. दरम्यान, अनेक घरे, फ्लॅट्स बंद असल्याचे हेरुन चोरटे दिवसा ‘रेकी’ करुन रात्रीच्या वेळी घरफोड्या करतात, हा पॅटर्न अनेकदा उघड झाला आहे. त्यामुळे शहरातीस तेराही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोसायट्या, अपार्टमेंट, बंगले, रो हाऊस या ठिकाणी खबरदारीबाबत संबंधित हद्दीतील पोलीस ठाणे नागरिकांशी संवाद साधत आहेत.

साध्या वेशात पोलीस

सध्या दिवाळीची खरेदी सुरु असून बाजारपेठेत उत्साह आहे. मेनरोड, शालिमार, सिटीसेंटर मॉल, कॉलेजरोड आदी भागांत सध्या गर्दी वाढत असून बसस्थानकांवरही मोठी गर्दी पाहायला मिळते आहे. त्यामुळे चोरी किंवा अन्य गंभीर घटना टाळण्यासाठी त्या-त्या हद्दीतील पोलिसांनी स्वतंत्र बंदोबस्त तैनात केला असून संशयास्पद व्यक्ति च्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात आले आहे. विशेष करुन बसस्थानके, मेनरोड व सिटी सेंटर मॉल भागात नियमित ‘पेट्रोलिंग’सुरु आहे. याच ठिकाणांवर साध्या वेशातील पोलीस व गुन्हेशाखेची पथके नजर ठेऊन आहेत.

नागरिकांसाठी सूचना

  • दागिने, पैसे व मौल्यवान वस्तू घराबाहेर नेताना काळजी घ्यावी
  • गावी जाणार असल्यास सोसायटी, बंगला, घराबाहेर सीसीटीव्ही कार्यान्वित ठेवा
  • एखाद्या व्यक्तिवर संशय आल्यास ‘डायल ११२’ वर संपर्क साधावा
  • गावी असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर अपलोड करु नये
  • सोसायट्या, बंगले, रोहाऊसबाहेर नाइट वॉचमन, सुरक्षारक्षक नेमावे
  • गावी जाणार असल्याची माहिती शेजाऱ्यांना द्यावी
  • मौल्यवान ऐवज रोकड, दागिने, बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावेत
  • सीसीटीव्ही दुरूस्त करुन घ्यावेत

सुट्ट्यांच्या कालावधीत आयुक्तालय हद्दीतील आक्षेपार्ह तसेच चोरी व घरफोडीच्या घटना रोखण्यासाठी ‘आधुनिक’ गस्त सुरु आहे. पोलीस ठोणनिहाय पथकांच्या मदतीला ‘साईड ब्रान्च चे अधिकारी व अमलदार नेमले असून ‘आपला शेजारी, खरा पहारेकरी’, या उपक्रमानुसार पोलीस पथके स्थानिकांशी संवाद साधत आहेत.

किरणकुमार चव्हाण,पोलीस उपायुक्त, गुन्हे व विशेष शाखा, नाशिक

ताज्या बातम्या

Nashik Accident News : चाचडगाव टोलनाक्याजवळ ईरटीका-स्कॉर्पिओचा भीषण अपघात; चौघे जागीच...

0
दिंडोरी | Dindori तालुक्यातील नाशिक-पेठ रस्त्यावरील (Nashik-Peth Road) चाचडगाव टोलनाक्याजवळ (Chachadgaon Toll Plaza) ईरटीका आणि स्कॉर्पिओचा भीषण अपघात (Ertika-Scorpio Accident) झाल्याची घटना घडली आहे. या...