Sunday, January 25, 2026
Homeक्राईमNashik Crime News : कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या लखोबा लोखंडेला बेड्या

Nashik Crime News : कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या लखोबा लोखंडेला बेड्या

नाशिक | भारत पगारे | Nashik

मॅट्रिमनी वेबसाईटवर अनेक प्रोफाइल बनवून विवाहोच्छुक तरुणींना लग्नाच्या (Girl Marriage) जाळ्यात ओढत लैंगिक अत्याचार करणाऱ्या माहिम येथील लखोबा लोखंडे अर्थात मुस्तफा मेहबूब जोगीलकर (वय २८) या संशयितास मुंबई नाका पोलिसांनी (Mumbai Naka Police) मुंबईतून ताब्यात घेतले आहे. त्याने कोपरखैरणे येथील एका पीडितेस असेच आमिष दाखवून तब्बल एक कोटी ९० लाख तर, नाशिकमधील पीडितेस २४ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. मुस्तफासह त्याचे वडील मेहबूब यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरु करण्यात आली आहे.

- Advertisement -

काही दिवसापूर्वी नाशिकमध्ये (Nashik) राहणारी पीडित महिला मुंबई नाका पोलीस ठाण्यात आली. तिने संशयित जोगीलकर याच्यावर गंभीर आरोप करुन त्याने अत्याचार करत २४ लाख रुपये उकळल्याची आपबिती कथन केली होती. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेने परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष नरुटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जितू वाघ आणि पथकास प्रकरणाचा छडा लावण्याचे आदेश दिले होते.

YouTube video player

दरम्यान, त्यानुसार वाघ यांनी तपासास प्रारंभकेला असता अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. यात संशयित मुस्तफा याचे नाव समोर येताच व ओळख पटताच मुंबई नाका पोलिसांनी (Police) सापळा रचून त्याला ताब्यात (Arrested) घेतले. अधिक तपासात मुस्तफाला त्याचे वडील मेहबूब हे सहाय्य करत होते, असे उघड होत आहे.

कॅडबरी, पाणी आणि तांत्रिक विद्या?

मुस्तफा याने आतापर्यंत तीन ते चार तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांचे कोट्यवधी रुपये लाटले आहेत. मुस्तफा हा भेटीदरम्यान पाणी पिण्यास किंवा कॅडबरी खाण्यास देत. त्यानंतर तो जसे सांगेल तसे आम्ही करत होतो, असे पीडितांनी पोलिसांना सांगितल्याचे समजते. मुस्तफा हा कधी हिंदू तर कधी मुस्लीम नावे वापरत होता.

‘स्थळ’ जमवण्यासाठी मेहबूब

मुस्तफा हा २६ वर्षांचा असून, त्याने विविध मॅट्रिमनी, शादी डॉट कॉम व तत्सम संकेतस्थळांवर पाच ते आठ वेगवेगळ्या प्रोफाइल बनवल्या. याच माध्यमातून काही महिन्यांपासून स्वतः ला उद्योजक, व्यावसायिक, अधिकारी व नोकरदार असल्याचे भासविले. त्यामुळे कुठल्याही तरुणीची ऑनलाइन रिक्वेस्ट येताच तो चॅटिंग करत होता. यात त्याचे वडील मेहबूब हे विविध विवाह व निकाह करण्यासाठी मध्यस्थी करत होते. मुस्तफाची बुलेट, कार जप्त करण्यात आली असून, त्यांचे आर्थिक व्यवहार पडताळले जात आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 866 ग्रामपंचायतींच्या निवडणुका आता पुढील वर्षीच?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्या ना कोणत्या कारणाने रखडत लांबल्याचे दिसत आहेत. यामुळे नगर जिल्ह्यात मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही लांबणीवर पडणार असून...