Friday, January 23, 2026
Homeक्राईमNashik Crime : खून करून वर्षभरापासून फरार असलेल्या संशयिताच्या आवळल्या मुसक्या

Nashik Crime : खून करून वर्षभरापासून फरार असलेल्या संशयिताच्या आवळल्या मुसक्या

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शिवाजीनगर भागात किरकोळ कारणावरून एका तरुणाची हत्या (Murder) करणाऱ्या व वर्षभरापासून फरार असणाऱ्या संशयिताच्या गुन्हे शाखा अंबड पथकाने पुण्यात जाऊन मुसक्या आवळल्या. गंगापूर पोलीस ठाण्याच्या (Gangapur Police Station) हद्दीत महात्मा फुले गार्डन, शिवाजीनगर येथे (दि.९ मे २०२४) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास रितेश माथे, वय २६ वर्षे, याचा अरबाज मोहम्मद शेख, संजय प्रधान व इतर दोन अनोळखी व्यक्तींनी किरकोळ भांडणाचा राग मनात धरून धारदार शस्त्राने वार करून जीवे ठार मारण्याच्या प्रयत्न केला होता. त्यात रितेशचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला होता. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

- Advertisement -

संजय उर्फ अतुल गणेश प्रधान, ( रा. कार्बन नाका, श्रमिकनगर, सातपुर, नाशिक) ,शुभम बाळासाहेब जाधव ( रा. शिवानीनगर, सातपुर, नाशिक ) अरबान मंहमद शेख ( रा. धर्मानी कॉलनी, नाशिक ) यांना अटक करण्यात आली होती. हा गुन्हा घडल्यापासुन रोहीत थापा हा फरार होता. तो मध्ये प्रदेश इंदौर, रत्नागिरी, पुणे येथे त्याचे अस्तीत्व लपवत वास्तव्य करीत होता. फरार संशयित थापा हा पुणे (Pune) येथे असल्याची गोपनिय माहीती गुन्हे शाखा अंबड पथकाचे प्रभारी उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांना मिळाली.

YouTube video player

त्यांनी सदर माहिती वरिष्ठांना देत त्यांच्या मार्गदर्शनाखाली बावधान पोलीस ठाणे हद्दीतील पायगुडे नगर, सुसगाव, पुणे या परिसरात सापळा लावुन संशयित (Suspect) रोहीत हूमबहादुर थापा (वय २२ वर्षे, रा. वैभव जोशी यांच्या घरात भाडयाने अतुल व्योती बिल्डींग, महादेव मंदिराजवळ, श्रमिकनगर, सातपुर, नाशिक ) यास ताब्यात घेतले.त्याला पुढील तपास कमी गंगापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

दरम्यान, ही कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक (Sandeep Karnik) उपायुक्त गुन्हे किरणकुमार चव्हाण सहायक आयुक्त गुन्हे संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि. जगवेंद्रसिंग राजपुत, उपनिरीक्षक मोतीलाल पाटील,श्रेणी उपनिरीक्षक दिलीप सगळे,सहायक उपनिरीक्षक सुहास क्षिरसागर, हवालदार प्रकाश बोडके, परमेश्वर दराडे ,योगेश चव्हाण, भूषण सोनवणे, सविता कदम यांनी केली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्ह्यात एक लाखांहून अधिक लाडक्या बहिणींची अडचण?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाइन ई-केवायसी प्रक्रियेने नगर जिल्ह्यातही महिलांची डोकेदुखी वाढवली. त्यातच जानेवारी महिन्यात अनेक पात्र...