Wednesday, January 7, 2026
Homeक्राईमNashik Crime : चोरलेल्या दुचाकींचा शोध; पंधरा वाहनांसह तिघे ताब्यात

Nashik Crime : चोरलेल्या दुचाकींचा शोध; पंधरा वाहनांसह तिघे ताब्यात

विधिसंघर्षिताचाही सहभाग

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

चोरलेल्या पंधरा दुचाकीपैंकी (Bikes) नाशिक शहर व जिल्ह्यातील केवळ चार गुन्हे (Case) उघड झाले आहेत. ही कारवाई गुन्हेशाखा युनिट एकने (Crime Branch Unit One) शनिवारी (दि. १९) केली असून असून अकरा दुचाकींचे रेकॉर्ड समोर येत नसल्याने त्या बेवारस म्हणून गणल्या जाणार आहेत. त्यामुळे दुचाकी मालकांनी कागदपत्रे घेऊन सरकारवाडा पोलीस ठाण्यात संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

- Advertisement -

शहर व परिसरात दुचाकी चोरीच्या (Stolen) घटना नित्याच्याच असून, दररोज एक ते तीन दुचाकी चोरीस जातात. अशातच चोरट्यांच्या शोधात असलेल्या गुन्हेशाखा युनिटने तिघांना ताब्यात घेतले आहे. एका विधीसंघर्षित बालकालाही ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून १० लाख ४० हजार रुपये किंमतीच्या १५ चोरीच्या दुचाकीही हस्तगत केल्या आहेत. सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) दाखल दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करतांना गुन्हे शाखा युनिट एकचे अंमलदार गोरक्ष साबळे, राम बर्डे, विलास चारोस्कर, आप्पा पानवळ यांना गुप्त माहिती मिळाली.

YouTube video player

संशयित दुचाकीवर छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील निलगिरी बाग येथे येणार असल्याचे कळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना माहिती दिली. त्यान्वये पथकाने सापळा रचून संशयित सत्यम ऊर्फ देवा मिलिंद गरुड (२१, रा. आमदार मळा,, माऊली चाळ, ओझर, ता. निफाड), साहिल आझाद शेख (२१, रा. दहाव्या मैलाच्या पुढे, टिळकनगर कॉलेजच्या बाजूला, भगतसिंग नगर, ओझर, ता. निफाड) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ६० हजार रुपये किमंतीची चोरीची दुचाकी हस्तगत केली.

दरम्यान, संशयितांच्या (Suspected) साथीदारांनी शहर व ग्रामीण भागातून एकूण पंधरा दुचाकी चोरी करून त्या विधीसंघर्षित बालक व खेडगाव येथील संशयित विकास बन्सीलाल कुमावत यांच्याकडे विक्रीसाठी दिल्याचे सांगितले. त्यानुसार संशयित कुमावत व विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेत त्यांच्याकडून नऊ लाख ८० हजार रुपयांच्या १४ दुचाकी जप्त केल्या. पंधरापैकी चार दुचाकींच्या चोरीचे शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून, उर्वरित ११ दुचाकींबाबतची माहिती पोलिसांकडे उपलब्ध नाही.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : फोटो मॉर्फिंगद्वारे राजकीय हल्ला; माजी नगरसेवकाची...

0
नाशिक | प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता तंत्रज्ञानाची धोकादायक जोड मिळाल्याचे सिडकोतील (Cidco) एका प्रकारातून उघड झाले आहे. एआयचा वापर करून...