Wednesday, January 7, 2026
Homeक्राईमNashik Crime : अलिशान गाडीतून गुटख्याची तस्करी करणारा गजाआड; दोघांवर गुन्हा, वाहनासह...

Nashik Crime : अलिशान गाडीतून गुटख्याची तस्करी करणारा गजाआड; दोघांवर गुन्हा, वाहनासह ११ लाखांचा ऐवज जप्त

ओझे | वार्ताहर | Oze

गेल्या अनेक महिन्यांपासून वणी व परिसरात गुटख्याची (Gutkha) तस्करी करुन पोलिसांना (Police) गुंगारा देणाऱ्या संशयितांच्या वणी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तर दोन संशयितांवर (Suspected) गुन्हा दाखल करुन ११ लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी (Police) जप्त केला असून, एकास गजाआड करण्यात आले आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी, वणी व परिसरात खुलेआम गुटख्याची तस्करी होत असल्याची माहिती सपोनी गायत्री जाधव यांना मिळाली. तसेच हा गुटखा व प्रतिबंधीत सुगंधित तंबाखु गुजरात राज्यातून महाराष्ट्रात येत असल्याची खात्रीशीर
गोपनीय माहीती मिळाल्यानंतर वणी-सापुतारा रस्त्यावर (Vani Saputara Road) पोलिस उपनिरीक्षक हेमंत राऊत व पोलिस पथकाने पाळत ठेवली असता धनाई मातेच्या मंदिराजवळ अंबानेर शिवारात एमएच ४६ झेड ४३९० या क्रमांकाची महिंद्रा एसयूव्ही हे वाहन आले. या वाहनाच्या काचा काळ्या केलेल्या असल्याने आतमधून काही दिसणार नाही याची खबरदारी घेण्यात आली होती. आरटीओच्या नियमांचा भंग बेमालूमपणे करण्यात आल्याचे पोलिस उपनिरीक्षक हेमंत राऊत यांच्या निदर्शनास आले.

YouTube video player

सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे तस्कराने दिली. त्यानंतर तपासणी अंती महाराष्ट्रात (Maharashtra) प्रतिबंधित असलेला सुगंधी तंबाखू व गुटखा सदृश्य ऐवज आढळला. त्यानतंर सदर वाहन पोलिस ठाण्यात आणण्यात आले असता त्यात एकूण २० सफेद रंगाच्या प्लास्टीकच्या गोण्या आढळल्या. त्यापैकी प्रत्येक गोणीमधे २२ विमल पानमसाल्याची पाकिटे असे एकूण ४४० पाकिटे किंमत प्रति पाकिट १९८ रुपये एकूण किंमत ८७ हजार १२० रुपये व्हाय ब्रंट प्रोडक्ट व्हिलेज ककाडकोपर वलसाड जिल्हा गुजरात व एकूण सफेद रंगाच्या दोन प्लास्टिकच्या गोण्या त्यापैकी प्रत्येक प्लास्टिकच्या गोणीत एकूण १० वि १ तंबाखूचे पाकिटे त्यामधे ११ पुड्या असे एकूण ४४० पाकिटे एकूण किंमत ९६८० रुपये नेमी प्राडक्टस् देगाम वलसाड, राज्य गुजरात असे उत्पादकाचे नाव असून, काळ्या रंगाची महिंद्रा एसयूव्ही किमंत दहा लाख रूपये, एक ओपो कंपनीचा मोबाईल किंमत १० हजार रुपये असा एकूण ११ लाख ६ हजार आठशे रुपयांचा ऐवज जप्त केला.

दरम्यान, याप्रकरणी मजाजखान उर्फ मुज्जु रोशनखान पठाण रा.भगवतीनगर कसबे वणी व शाहीद (पुर्ण नाव नाही ) अशा दोघा तस्करांवर राज्य उत्पादन शुल्क गुजरात व सेंट्रल एक्साईज भारत सरकार यांच्याकडील सदर गुटख्याकरीता असलेला कर बुडवून सदर प्रतिबंधीत अन्न पदार्थ केसर युक्त विमल पान मसाला व वि -१ तंबाखु हा महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी असताना देखील स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संगनमत करुन विक्रीसाठी वाहून अन्न सुरक्षा मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मजाजखान पठाण उर्फ मुज्जु यास अटक (Arrested) करण्यात आली असून, शाहीदचा शोध पोलीस घेत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : फोटो मॉर्फिंगद्वारे राजकीय हल्ला; माजी नगरसेवकाची...

0
नाशिक | प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता तंत्रज्ञानाची धोकादायक जोड मिळाल्याचे सिडकोतील (Cidco) एका प्रकारातून उघड झाले आहे. एआयचा वापर करून...