Friday, April 25, 2025
Homeक्राईमNashik Crime : सोनसाखळी चोरट्यांना अटक

Nashik Crime : सोनसाखळी चोरट्यांना अटक

गुन्हे शाखा युनिट दोनची कामगिरी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पाथर्डीफाटा परिसरातील वासननगर येथे एका व्यक्तीच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी (Gold Chain Thieves) करणाऱ्या दोघा भामट्यांना गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने सापळा रचून अटक (Arrested) केली. इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या (Indiranagar Police Station) हद्दीत दाखल गुन्ह्यातील फिर्यादी ह्या त्यांचे घरापासून गामणे ग्राउंडकडून वासन टोघाटा शोरूमकडे पायी जात असताना शुभम किराणा प्रोव्हीजनजवळ नवीन बांधकाम बिल्डींगजवळ वासननगर येथून दोन अनोळखी व्यक्ती हे सुझुकी बर्गमन मोपेडवरून येवून फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची पोत बळजबरीने हिसकावून चोरून घेवून पळून गेले होते.

- Advertisement -

या गुन्ह्यातील संशयिताच्या (Suspected) शोधासाठी गुन्हे शाखा, युनिट-२ वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही. डी. श्रीमनवार, सहायक पोलीस निरीक्षक डॉ. समाधान हिरे, सहायक उपनिरीक्षक गुलाब सोनार, हवालदार नंदकुमार नांदुडर्डीकर, प्रकाश महाजन, नितीन फुलमाळी, किरण आहिरराव, वाल्मीक चव्हाण, मनोज परदेशी, अंमलदार संजय पोटींद यांनी संशयितांचा शोध घेत असतांना हवालदार नितीन फुलमाळी व अंमलदार संजय पोर्टींद यांनामुसा अय्युब सैय्यद (४० वर्षे, रा. जामा मशिद जवळ, घर नं. ३३५, आडगाव, नाशिक) रोहित गणेश राठोड (२४ वर्षे, रा. शिवनेरी नगर, घर नं. ३८०, टाकळी फाटा, नाशिक) हे दोघे पाथर्डी फाटा चौकात सुझुकी बर्गमन (एम एच १५ जेटी ५२९१) या मोपेडवर संशयितरित्या फिरतांना दिसले.

त्यांच्याकडे चौकशी करता त्यांनी इंदिरानगरमध्ये गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून २४ तासांच्या आत गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल व फिर्यादी यांच्याकडून बळजबरीने हिसकावलेली सोन्याची पोत असा १ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून इंदिरानगर पोलीस स्टेशनला वर्ग करण्याची उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. दरम्यान ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्र.२ (Crime Branch Unit Two) कडील बरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही. डी. श्रीमनवार, सहायक निरीक्षक हिरे, सहायक उपनिरीक्षक गुलाब सोनार, हवालदार नंदकुमार नांदुडर्डीकर, प्रकाश महाजन, नितीन फुलमाळी, किरण आहिरराव, बाल्मीक चव्हाण, मनोज परदेशी, अंमलदार संजय पोर्टींद, अतुल पाटील, जितेंद्र बजीर यांनी केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...