Wednesday, February 4, 2026
Homeक्राईमNashik Crime : अवघ्या काही तासांतच पोलिसांनी 'त्या' युवकाच्या खूनप्रकरणी दोघांना ठोकल्या...

Nashik Crime : अवघ्या काही तासांतच पोलिसांनी ‘त्या’ युवकाच्या खूनप्रकरणी दोघांना ठोकल्या बेड्या; हत्येचे कारणही आले समोर

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

नाशिक शहर व नाशिकरोड परिसरात गुन्हेगारीने थैमान मांडले असून, खुनाचे सत्र सुरूच आहे. गेल्या सहा दिवसात झालेला हा दुसरा खून असल्याने यामुळे पोलीस यंत्रणा सुद्धा हैराण झाली आहे. आज (मंगळवारी) पहाटे जय भवानीरोड (Jay Bhavani Road) येथे अमोल मेश्राम (वय ४३) नावाच्या युवकाचा खून करण्यात आला होता. यानंतर आता पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, कुणाल सौदे आणि अमन शर्मा असे अटक करण्यात आलेल्या संशियतांची नावे असून, प्रॉपर्टीच्या वादातून हा खून झाल्याचे समजते. शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलीस आयुक्तांनी तब्बल १२ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या पोलीस आयुक्तालया अंतर्गत बदल्या केल्या होत्या. त्यानंतर गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी नाकाबंदी ऑपरेशन सुद्धा सुरू केले आहे. परंतु, अद्यापही या ऑपरेशनचा गुन्हेगारांना काही फरक पडलेला दिसत नाही.

YouTube video player

दरम्यान, आज (मंगळवार) पहाटे पाच वाजेच्या सुमारास मेश्राम हा नेहमीप्रमाणे जवळच असलेल्या मंदिरात दर्शनासाठी गेला होता. मात्र, यावेळी अंधाराचा फायदा घेऊन काही अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले होते. त्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडल होता. यानंतर मुलगा (Son) घरी आला नाही म्हणून आई शोधण्यासाठी गेली असता तिला अमोल जखमी अवस्थेत दिसला. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे डॉक्टरांनी तपासून अमोल मेश्रामला मृत घोषित केले होते.

ताज्या बातम्या