Friday, April 25, 2025
Homeक्राईमNashik Crime : तळीरामांना पोलिसी दणका; थर्टीफर्स्ट सेलिब्रेशन पोलीस ठाण्यात

Nashik Crime : तळीरामांना पोलिसी दणका; थर्टीफर्स्ट सेलिब्रेशन पोलीस ठाण्यात

दोनशे वाहनांची तपासणी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नववर्षाचे (New Year) स्वागत करण्यासाठी ‘ओली पार्टी’ करुन शहरात वाहनांवरुन फिरणाऱ्यांची धरपकड करीत पोलिसांनी पंचावन्न तळीरामांची ‘थर्टी फर्स्ट’ पोलीस ठाण्यात नेत साजरी केली. संबंधितांवर मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हे नोंदविण्यात आले. तर शहरात ७३ ठिकाणी ‘स्टॉप अँड सर्च’ व ३९ ठिकाणी नाकाबंदी करुन दोनशेपेक्षा जास्त वाहनांची तपासणी करण्यात आली. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांच्या आदेशान्वये नववर्ष स्वागत व ‘थर्टी फर्स्ट’ निमित्ताने चोख बंदोबस्त नेमण्यात आला होता.

- Advertisement -

सर्व पोलीस ठाणे, वाहतूक शाखांसह गुन्हे शाखांची पथके सायंकाळी सात वाजेपासून १ जानेवारीच्या पहाटे साडेपाचपर्यंत रस्त्यावर तैनात होती. उपायुक्त किरणकुमार चव्हाण, प्रशांत बच्छाव, मोनिका राऊत, चंद्रकांत खांडवी यांच्या पथकांनी शहरातील नाकाबंदीचा वेळोवेळी आढावा घेतला. त्यामुळे शहरात सेलिब्रेशनवेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. परंतु, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना वर्षाखेरीस पोलिसांनी (Police) कारवाई केली. विशेष म्हणजे, विशेष शाखा, निर्भया व दामिनी मार्शल्स यांना पाचारण करण्यात आले. शहरातील गल्लीबोळांसह प्रमुख चौकांत पोलिसांचे ‘नाइट आउट’ पहाटेपर्यंत सुरू होते.

चौकांत पथकांचीच गर्दी

३१ डिसेंबर रोजी मंगळवार असल्याने अनेकांनी घरात ‘सेलिब्रेशन’ करण्यावर भर दिल्याचे जाणवले. रात्री साडेदहानंतर कॉलेजरोड व गंगापूररोड परिसरात (Gangapur Road) फार गर्दी नव्हती. कॉलेजरोड येथील मॉडेल कॉलनी, कॅनडा कॉर्नर, बीवायके सिग्नल या चौकांत पोलीस आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त, वरिष्ठ निरीक्षकांसह जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथकांच्या वाहनांची गर्दी झाली. सेलिब्रेशन करणाऱ्या तरुणाई किंवा नागरिकांसह पोलीस पथकांच्या गर्दीमुळे सेलिब्रेशनचा जोर अपेक्षेइतका दिसला नाही. भद्रकाली, अंबड, सातपूर व पंचवटी येथील आस्थापनादेखील रात्री साडे अकरा-बारा वाजेनंतर बंद होताना दिसल्या. त्यामुळे पहाटे दीड-दोननंतर पोलिसांच्या बंदोबस्ताचा ताण हलका झाला.

पोलीस कारवाई

तळीराम – ५५
गस्ती वाहने – ०५
स्टॉप अॅड सर्च – ७३
नाकाबंदी – ३९

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...