नाशिक | Nashik
खासगी सावकार व खंडणीखोर वैभव देवरे (Vaibhav Deore) याचा क्रूरपणा एका गंभीर गुन्ह्याने (Crime) उजेडात आला आहे. पोलिसांनी (Police) जप्त केलेल्या त्याच्या कारमध्ये रक्ताचे डाग आढळले आहेत. पोलिसांनी फॉरेन्सिकच्या मदतीने रक्ताचे हे डाग व नमूने ताब्यात घेतले असून, तपासणीसाठी फॉरेन्सिक विभागाकडे पाठविले आहे. त्यामुळे देवरे याने व्याज व खंडणी वसूली करताना अनेकांना गंभीर इजा पोहोचविल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने तपास करण्यासाठी पोलिसांच्या मागणीनुसार न्यायालयाने (Court) देवरेच्या पोलीस कोठडीत पुन्हा ५ दिवसांची वाढ केली आहे.
हे देखील वाचा : Nashik Political : ना. झिरवाळांनी ननाशीत दवाखाना दिल्याने हजारोंना फायदा – देशमुख
अवैध सावकारी करुन कर्जदारास आत्महत्येस (Suicide) प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या वैभव यादवराव देवरे याच्या पोलीस कोठडीत (Police Custody) न्यायालयाने ५ दिवसांची वाढ केली आहे. देवरे याच्यासह त्याची पत्नी सोनाली व शालक निखिल पवारविरोधात चहा व्यावसायिक धीरज पवार (रा. सहदेव नगर, गंगापूर रोड) यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. धीरज पवार यांनी वणी येथील नांदुरी घाटाच्या जंगलात गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यांची पत्नी गीतांजली यांच्या फिर्यादीनुसार वैभव देवरेसह त्याची पत्नी सोनाली व शालक निखिल पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे.
हे देखील वाचा : Maharashtra News : निवडणुकीच्या तोंडावर राज्यात पैशांचा महापूर; नाशिक, कसारा घाटात नाकेबंदीत दोन कोटी ३१ लाखांची रोकड हस्तगत
धीरज यांनी वैभवकडून कर्ज घेतले होते. मात्र, एक हप्ता चुकल्याने वैभवसह इतर दोघांनी त्यांना दमदाटी करीत २५ लाख रुपयांची खंडणी मागितली, तसेच मारहाण (Beating) करुन जीवे मारण्याची धमकी दिली किंवा आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. पोलिसांनी सुरुवातीस सोनाली देवरे व निखिल पवार यांना अटक केली. तर वैभव फरार झाला होता. दोघांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर वैभवला पिंपरी चिंचवड येथून अटक केली. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यास बुधवारी (दि.३०) पुन्हा न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने त्याच्या कोठडीत पाच दिवसांची वाढ केली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा