Wednesday, January 7, 2026
Homeक्राईमNashik Crime : पंचवटी, आडगाव, म्हसरूळ पोलिस ॲक्शन मोडवर; १७९ रिक्षाचालकांवर कारवाई,...

Nashik Crime : पंचवटी, आडगाव, म्हसरूळ पोलिस ॲक्शन मोडवर; १७९ रिक्षाचालकांवर कारवाई, ३८ गुन्हे दाखल

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

नाशिक शहर पोलीस (Nashik City Police) सद्यस्थितीत ॲक्शन मोडवर आले असून गुन्हेगारांचं मुजोर रिक्षा चालकांवर देखील कारवाईचा बडगा उभारला आहे. पंचवटी, म्हसरूळ, आडगाव पोलीस ठाणे (Police Station) हद्दीत एकूण १७९ रिक्षाचालकांची तपासणी केली असून ३८ पेक्षा चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पंचवटी विभागातील काही रिक्षाचालकांमध्ये (Rickshaw Pullers) सुधारणा तर काही परिस्थिती जैसे थे आहे.यामुळे रिक्षा चालकांवर होणाऱ्या कारवाईचा फास आवळण्याची गरज असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

- Advertisement -

रिक्षाचालकांची मुजोरी, टवाळखोरपना, छेडछाडचे घडणारे प्रकार नाशिककरांना (Nashik) काही नवीन नाही. रविवारी (ता.१९) रोजी रविवार कारंजा परिसरात एका रिक्षाचालकाने दुचाकीवरून जात असलेल्या युवतीवर हल्ला केला. पीडित युवती आपल्या दुचाकीला रिक्षाचालकाने कट मारल्यानंतर त्याबाबत विचारणा केली असता रिक्षाचालकाने तिला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली होती. यानंतर सरकारवाडा पोलिसांनी (Sarkarwada Police) तत्काळ कारवाई करत संशयित रिक्षाचालकाच्या मुसक्या देखील आवळल्या होत्या. रिक्षा चालकांची वाढती मुजोरी बघता पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी संबंधित पोलिस ठाण्यांना रिक्षाचालकावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते.

YouTube video player

त्यानुसार पंचवटी विभागात (Panchvati Area) पोलिसांनी सोमवार ता.१९ पासून कारवाईचा बडगा उगारला होता. मोटार वाहन कायदा २०७ प्रमाणे पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत ५० रिक्षाचालकांची कागदपत्रे तपासणी केली आणि १७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. आडगाव पोलीस ठाणे हद्दीत जवळपास ७० रिक्षाचालकांची कागदपत्रे तपासणी केली आणि ६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत ५९ रिक्षाचालकांची कागदपत्रे तपासणी केली आणि १५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाई मुळे पंचवटी विभागात काही रिक्षाचालकांमध्ये सुधारणा दिसून येत आहे, तर काही रिक्षाचालकांचे वर्तन जैसे थे असल्याचे नागरिकाचे म्हणणे आहे.

ताज्या बातम्या

Nashik Accident News : चाचडगाव टोलनाक्याजवळ ईरटीका-स्कॉर्पिओचा भीषण अपघात; चौघे जागीच...

0
दिंडोरी | Dindori तालुक्यातील नाशिक-पेठ रस्त्यावरील (Nashik-Peth Road) चाचडगाव टोलनाक्याजवळ (Chachadgaon Toll Plaza) ईरटीका आणि स्कॉर्पिओचा भीषण अपघात (Ertika-Scorpio Accident) झाल्याची घटना घडली आहे. या...