Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमNashik Crime : गोंदे शिवारात ७०० किलो गोमांस पकडण्यात पोलिसांना यश

Nashik Crime : गोंदे शिवारात ७०० किलो गोमांस पकडण्यात पोलिसांना यश

वावी |वार्ताहर | Vavi

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या (Mumbai-Nagpur Samruddhi Highway) सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) गोंदे गावच्या शिवारात हॉटेल बिकानेर राजस्थान समोरून येणाऱ्या व समृद्धी महामार्ग पुलाखाली मुंबईकडे ७०० किलो वजनाचे गोमांस (Beef) घेऊन जाणाऱ्या सुझुकी कंपनीची एर्टिगा कारला वावी पोलिसांनी (Vavi Police) शनिवार (दि.०८ रोजी) सायंकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास मोठ्या शिताफीने पकडून पिकअप गाडीसह दोघांना अटक (Arrested) केली.

- Advertisement -

अवैद्य गोमांस वाहण्याचा कुठलाही परवाना नसताना छुप्या मार्गाने एर्टिगा कारचा (Ertiga Car) वापर करत गोमांस तस्करी करणाऱ्या एमएच ०१ सीएम ४१९१ या कारने वाहतूक संगमनेर (Sangamner) येथून ७०० किलो वजनाचे लहान मोठे अडकाचे व आतड्याचे गोमांस मुंबईच्या दिशेत जाणार असल्याची खबर मिळाल्याने पोलिसांनी (Police) तात्काळ सापळा रचत सलमान अरुण मणियार (३४) रा संगमनेर, आरिफ अल्ताफ शेख (२०) रा. संगमनेर दोघांना अटक केली असून त्यांच्याकडील एक लाख बारा हजार रुपयांचे गोमांस, चार लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची एर्टिगा कार असा एकूण पाच लाख १२ हजार रुपये किमतीचा गाडीसह मुद्देमाल जप्त केला आहे.

दरम्यान, वावी पोलिसांनी महाराष्ट्र गोवंश संरक्षण कायदा (Maharashtra Cattle Protection Act) १९७६ नुसार आरोपींवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एस आर दाते, एस आर बलसाने, देविदास माळी पुढील तपास करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...