Tuesday, September 8, 2026
Homeमहाराष्ट्रगणपती बाप्पा मोरया! प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या चित्ररथाने वेधले सर्वांचेच लक्ष

गणपती बाप्पा मोरया! प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या चित्ररथाने वेधले सर्वांचेच लक्ष

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आज देशभरात उत्साहात साजरा होत आहे.या प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा राजधानी नवी दिल्ली येथील कर्तव्य पथावर पार पडला. येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रदान नरेंद्र मोदी आणि प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन केले. यानंतर कर्तव्यपथावर झालेल्या सोहळ्यात सैन्यदलांनी आपली शस्त्रास्त्रे आणि संचलनातून भारताच्या सामर्थ्याचे प्रदर्शन केले. तसेच विविध राज्ये आणि मंत्रालयांच्या चित्ररथांनी देशाचा संपन्न सांस्कृतिक वारसा आणि विकसित भारताचं दर्शन घडवलं. यावेळी महाराष्ट्राच्यागणेशोत्सवावर आधारित चित्ररथानं सर्वांचं लक्ष वेधून घेतले.

यावेळी,महाराष्ट्राच्या चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ‘गणेशोस्तव – आत्मनिर्भर भारताचे प्रतिक’ अशी महाराष्ट्राची थीम होती. त्यामुळे दिल्लीत गणपती बाप्पा मोरयाचा गजर घुमला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियूष गोयल यांनी टाळ्या वाजवून कर्तव्य पथावर महाराष्ट्राच्या रथाचे कौतुक केले.

- Advertisement -

Nashik News: “मला सस्पेंड केलं तरी चालेल,पण, बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही”; महिला पोलिसाचा गिरीश महाजनांसमोर संताप

महाराष्ट्राच्या चित्ररथामध्ये डोक्यावरून नेण्यात येणारी गणेशमूर्ती, गणेशमूर्तीचे रंगकाम करणारा कलाकार, ढोलपथकात ढोल वाजवणारी महिला, अष्टविनायकांच्या प्रतिकृती, गणेश मंदिराची प्रतिकृती असा जिवंत देखावा मांडण्यात आली आहेत. तसेच या चित्ररथासोबत असलेल्या कलाकारांनी उत्कृष्ट नृत्याविष्कार करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा राज्यउत्सव आहे. या काळात राज्यामध्ये तब्बल 60 ते 70 लाख कोटींची उलाढाल होते. गणेशोत्सवाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारत या मोहिमेला कशी चालना मिळते, याचा संदेश महाराष्ट्राच्या चित्ररथातून देण्यात आला.

दरम्यान, आज प्रजासत्ताक दिनावेळी झालेल्या संचालनामध्ये देशातील १७ राज्ये आणि १३ मंत्रालयांचे मिळून ३० चित्ररथ सहभागी झाले होते. तसेच तिन्ही सैन्य दलांच्या जवानांनी यावेळी थरारक प्रात्यक्षिकेही दाखवली. प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला व़ॉन डेर लेयेन उपस्थित होत्या. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सैन्यदलांच्या जवानांचं अभिवादन स्वीकारले. तर संचलनामध्ये सहभागी झालेल्या कलाकारांच्या कलागुणांचे कौतुक केले.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : दोन लाचखोर सरकारी सेवकांना कारावास; कर्मचाऱ्यांसाठी इशारा

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik  शासकीय कामात लाचखोरी करून नागरिकांची अडवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणणारा निर्णय नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने (Nashik District and Sessions...