नाशिक | प्रतिनिधी | Nashik
उपनगर पोलिसांनी (Upnagar Police) एका मांजा विक्रेत्यास ताब्यात घेऊन तपास करत दोन मुख्य मांजा (Manja) वितरकांकडून ८० हजारांचा घातक मांजा जप्त केला आहे. या तिघांकडून नायलॉन मांजाचे १०१ गडू जप्त केले आहेत. तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर इंदिरानगर पोलिसांनी (Indiranagar Police) नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर कार्यवाही केली असून, शरयूनगरी येथून दोन संशयितांकडून नायलॉन मांजाचे १७ हजार पाचशे रुपयांचे ३५ गट्टू ताब्यात घेतले आहेत.
प्रज्ज्वल गुंजाळ (रा. मोरे मळा, नाशिकरोड), यश कांगणे (रा. शिवाजीनगर, नाशिकरोड) व शुभम गुजर (रा. भगवा चौक नाशिकरोड) अशी संशयितांची नावे आहेत. शहरात नायलॉन मांजाची विक्री, वापर व साठा करण्यावर प्रतिबंध आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात तडीपारीची कारवाई देखील प्रस्तावित केली जात आहे. नायलॉन मांजामुळे अनेकांना जीव गमवावे ला गले असून, गंभीर दुखापती देखील होत आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी शहरात नायलॉन मांजा विक्री, साठा करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश शहर पोलिसांना दिले आहेत.
हे देखील वाचा : Nashik Crime : महाठगाचे बिंग फुटले; राज्यपाल बनवण्यासाठी शास्त्रज्ञाकडून उकळले सहा कोटी
त्यानुसार परिमंडळ दोनच्या पोलीस उपआयुक्त मोनिका राऊत (Monika Raut) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त डॉ. सचिन बारी, उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, गुन्हे निरीक्षक संजीव फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलिसांनी सापळा रचून संशयितांना (Suspected) पकडले.
उपनगरला कारवाई
नाशिकरोड | पोलीस अंमलदार गौरव गवळी यांना मिळालेल्या माहितीनुसार, एक संशयित सैलानी बाबा चौक परिसरात नायलॉन मांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याचे समजले. त्यामुळे सापळा रचून जुना सायखेडा रोड येथे उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, हवालदार इमरान शेख, गवळी, अनिल शिंदे यांच्या पथकाने तपास करीत संशयावरून प्रज्वल गुंजाळ यास पकडले. सखोल तपासात त्याने हा मांजा यश व शुभम यांच्याकडून घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांच्याकडून मांजाचे ९९ गट्टू जप्त केले आहेत.
हे देखील वाचा : Nashik News : तुकाराम मुंढे मनपा आयुक्त होणार?
इंदिनगरला १७ हजारांचे गट्टू ताब्यात
इंदिरानगर । नायलॉन मांजा विक्री करणे व बाळगणे कायद्याने बंदी असतांना इंदिरानगर परिसरात खुलेआम मांजाची विक्री सुरु असल्याची गोपनीय माहिती इंदिरानगर पोलिसांना मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाने सापळा रचून एका विधिसंघर्षित मुलासह प्रतीक गोवर्धने (२२, पंचवटी) या संशयितांकडून ३५ नायलॉन मांजाचे गड्डू ताब्यात घेतले आहे. याबाबत दोघांवर पोलिसांनी कार्यवाही केली असून अधिक तपास इंदिरानगर पोलीस करीत आहेत. ही कार्यवाही गुन्हे शोधपथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण सोनार, सागर परदेशी, सागर कोळी, मुश्रीफ शेख, अमोल कोथमीर, योगेश जाधव, सौरभ माळी, शामल जोशी, जयलाल राठोड, दीपक पाटील, नंदू हरपडे आदिंसह अधिकारी व कर्मचारी यांनी केली.
हे देखील वाचा : Nashik Crime : साखळीचोराच्या कुटुंबाचा पोलिसांवर हल्ला