Saturday, January 24, 2026
Homeक्राईमNashik Crime : लोढेंना दिलासा; बागुल गँगला दणका; नेमकं काय घडलं?

Nashik Crime : लोढेंना दिलासा; बागुल गँगला दणका; नेमकं काय घडलं?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

‘ऑरा’बारमधील पूर्वनियोजित गोळीबारानंतर अटक (Arrested) केलेल्या लोंढे गँगला (Londhe Gang) न्यायालयाने शुक्रवारी काहीसा दिलासा देऊन न्यायालयीन कोठडी सुनावली तर, विसेमळा गोळीबाराप्रकरणी (Firing Case) ‘बागुल गँग’च्या अजयसह बोरिसाला न्यायालयाने पुन्हा पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. जोपर्यंत तुकाराम चोथवेसह इतर साथीदार ताब्यात येत नाहीत, तोपर्यंत बागुलांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे समजते.

- Advertisement -

विसेमळा ते रामवाडी मार्गावर २५ सप्टेंबर रोजी मध्यरात्री सचिन साळुंखे (रा. इंदिरानगर) या व्यावसायिकावर गोळीबार केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) बागूल टोळीवर प्राणघातक हल्ल्यासह भारतीय हत्यार काययद्यान्वये गुन्हा नोंद आहे. तपासात युनिट एकने संशयित सागर सुधाकर बागुल (रा. रामवाडी), संदीप रघुनाथ शेळके (४३, रा. रामवाडी), गौरव सुधाकर बागूल (रा. पंचवटी), प्रेमकुमार दत्तात्रय काळे (३५), वैभव उर्फ विकी दत्तात्रय काळे (२९, दोघे रा.रामवाडी), मामा उर्फ बाबासाहेब राजवाडे, अमोल भास्कर पाटील, अजय दिलीप बागुल, संदीप रघुनाथ शेळके, बाब्या उर्फ सचिन सुखलाल कुमावत व अजय जेठालाल बोरिसा यांना अटक केली होती.

YouTube video player

त्यानंतर सर्वांनाच दिवाळीपूर्वीच ‘सचबोल’ चे फराळ देण्यात आले होते. दरम्यान, संशयितांना न्यायालयाने दुसऱ्यांदा वाढीव पोलीस कोठडी सुनावली होती. मुदत संपल्याने संशयितांना शुक्रवारी (दि. १७) न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा तपास पथकाने, या प्रकरणात फायरिंग करणारा तुकाराम चोथवे पसार असून त्याच्यासह इतर संशयितांचा शोध घेण्यासाठी अजय बागुल व अजय बोरिसाकडे सखोल तपास करण्यासाठी पुन्हा पोलीस कोठडीची मागणी केली. त्यानुसार, दोघांना येत्या २२ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली. तर इतर संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे त्यांची रवानगी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. तपास उपनिरीक्षक चेतन श्रीवंत करीत आहेत.

भूषण, प्रिन्स पसारच

‘ऑरा’ बारमधील गोळीबारानंतर लोंढे गँगमधील भूषण लोंढे व प्रिन्स सिंग अद्याप पसार असून असून प्रकाश लोंढे, दीपक लोंढे, सनी विठ्ठलकर आदींची ‘पीएल’ गैंग पोलिसांच्या ताब्यात होती. संशयितांना न्यायालयाने दोनदा वाढीव पोलीस कोठडी सुनावल्यानंतर त्यांना सातपूर पोलिसांनी १७ ऑक्टोबर रोजी पुन्हा न्यायालयात हजर केले. तेव्हा, भूषणसह उर्वरित संशयित जेव्हा अटक होतील. तेव्हा सर्वच संशयितांची समोरासमोर चौकशी करण्यासाठी ताबा मिळावा, अशी विनंती केली. त्यानुसार, ती मान्य करीत एकूणच लोंढे गँगला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे आता लोंढे गँगची कारागृहात रवानगी झाली आहे.

फराळ खाऊन झालेल्यांना ‘बॉन्ड’

गेल्या दीड आठवड्यांपासून युनिट एकमध्ये दिवाळीपूर्वीच ‘कडक’ फराळ मिळालेल्या अनेक संशयितांकडून आता सीआरपीसी ११० सह अन्य कलमांनुसार चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र (बॉन्ड) लिहून घेण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात मुकेश शहाणे, सूर्यकांत लवटे, सनी कदम, मुकेश शेवाळे आदींच्या गुंडगिरीवर कायदेशिर बंधन आले आहे.

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो’चे दिमाखदार उद्घाटन

0
नाशिक | प्रतिनिधी Nasik नाशिकमधील घरांचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी हक्काचे व्यासपीठ ठरणाऱ्या दैनिक ‘देशदूत’ आयोजित ‘गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ चे आज (दि. २३ जानेवारी) उत्साही...