Tuesday, January 6, 2026
Homeक्राईमNashik Crime : लोंढे पुत्राला एन्काऊंटरची भीती; नाव बदलले, बोगस आधारकार्ड बनवले

Nashik Crime : लोंढे पुत्राला एन्काऊंटरची भीती; नाव बदलले, बोगस आधारकार्ड बनवले

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सातपूरच्या ‘ऑरा’ बारमध्ये ५ ऑक्टोबरच्या मध्यरात्री गोळीबार (Firing) करून खंडणी उकळल्याच्या गुन्ह्यात दोन महिन्यांपासून नाशकातून (Nashik) हरियाणा, राजस्थान व उत्तर प्रदेशात ओळख लपवून तब्बल सात हजार किलोमीटरपर्यंत पळ काढणाऱ्या भूषण लोंढेसह प्रिन्स सिंगला युनिट दोनच्या पथकाने नेपाळ सीमेजवळून अटक करत शुक्रवारी (दि.५) नाशिकमध्ये आणले.

- Advertisement -

नाशिक न्यायालयाने (Nashik Court) दोघांनाही शुक्रवारी सात दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे. दरम्यान, ओळख लपवताना भूषण व प्रिन्सने बनावट आधारकार्ड बनवल्याचे समोर आले असून याच आधारकार्डद्वारे त्याने युपीतील खासगी रुग्णालयात उपचार घेतल्याची माहिती उघड झाली आहे. देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातून भूषण लोंढेला अटक करण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी आदेश दिले होते.

YouTube video player

गुन्हे उपायुक्त किरणकुमार चव्हाण व सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांनी गुन्हे युनिट दोनला तांत्रिक विश्लेषणाच्या सूचना दिल्या. त्यानुसार सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर, डॉ. समाधान हिरे, ‘टीएडब्लू’च्या सहाय्यक निरीक्षक जया तारडे, श्रेणी उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, सहाय्यक उपनिरीक्षक शंकर काळे, अंमलदार प्रकाश महाजन, सुनील आहेर, अतुल पाटील, महेश खांडबहाले यांनी नेपाळ सीमेवर ही कारवाई केली होती.

दरम्यान, १५ नोव्हेंबर रोजी युपीतील बागपत बडोद गावात लेढि आणि साथीदार एका इमारतीत असताना पथकाने छापा (Raid) टाकला. तेव्हा वेदांत चाळगे, राहुल गायकवाड यांना ताब्यात घेतले. त्याचक्षणी गायकवाड आणि लोंढे या दोघांनी ३४ फूट उंचावरून उडी मारल्याने त्यांचा पाय फॅक्चर झाला होता. गायकवाड पकडला गेला, मात्र लोंढे उसाच्या शेतातून फरार झाला होता व प्रिन्स सिंग बाहेर असल्याने तो हाती लागला नाही. यानंतर लोंढेने प्रिन्स सिंगशी संपर्क साधला. त्यानंतर दोघे हरियाणामार्गे उत्तर प्रदेशातील महाराजगंज येथून नेपाळ बोर्डरजवळ गेले. ते येथील कोल्हुई गावात होते. पथकाने मेहनत घेऊन सिंगला अटक (Arrested) केली तर लोंढेला वेलनेस हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना ताब्यात घेतले होते.

सात हजार कि.मी. पळापळ

खून, खंडणीसह मोक्का व अन्य गंभीर गुन्हे असल्याने नाशिक पोलीस आपला ‘एन्काऊंटर’ करतील अशी भीती असल्याने भूषण व प्रिन्स हे गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि हरियाणा येथे लपत होते. त्यांनी सात हजार कि.मी. हून अधिकचे अंतर पार केल्याचे समोर येत आहे. तसेच युनिट दोनने एकूण २३०० किलोमीटरचा प्रवास करून लोंढेला अखेर नाशिकमध्ये आणत ‘नाशिकचा बालेकिल्ला’ वदवून घेतला.

ठळक मुद्दे

  • लोंढे गँग नाशिकमधून कसे व कुठे गेले याचा तपास
  • नाशिकमधून चाळगे, गायकवाड, लोंढे, गायकवाड सोबतच पळाले
  • लाखो रुपये नेत मोबाईल बाळगून हॉटेल, लॉज बुकिंग केले
  • मोबाईलच्या संपर्कामुळे दोघे सापडले
  • बोगस आधारकार्ड कुठून व कधी बनवले याचा शोध सुरू

ताज्या बातम्या

रविंद्र

“माझ्या त्या वक्तव्याकडे…”; विलासरावांवरच्या ‘त्या’ वक्तव्यावर रविंद्र चव्हाणांची आज एका वाक्यात...

0
छ. संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagarमहाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील, अशी भाषा करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना विलासरावांचा...