नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road
नाशिक जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील (Nashik Road Central Jail) अनेक सराईत गुन्हेगारांचे अंमली पदार्थांचे सेवन करतानाचे फोटो आणि व्हिडीओ (Photos and Video) सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नाशिक जिल्हा कारागृह चर्चेचा विषय बनला आहे. यापूर्वी देखील अनेकदा नाशिक जिल्हा कारागृहाच्या कैद्यांकडून शेकडो मोबाईल जप्त करण्यात आले असून, याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहे.
त्यानंतर आता नाशिकरोड कारागृहात कैद्यांचा गांजा सेवन करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने चारही बाजूने कडेकोट बंदोबस्त असताना देखील कारागृहात मोबाईल आणि अंमली पदार्थ गेलेच कसे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर यावर कारागृह अधीक्षकांनी सदरचे फोटो व व्हिडिओ जुने असल्याचे म्हटले आहे. मध्यवर्ती कारागृहात महाराष्ट्रभरातील (Maharashtra) विविध जिल्ह्यातील अनेक कुख्यात गुन्हेगारांना शिक्षा सुनावल्यानंतर ठेवण्यात येते. यामध्ये मुंबई आणि पुण्यामधील अनेक सराईत गुन्हेगारांच्या टोळ्या बंद आहे.
या टोळ्यांची मोठी दहशत असून, त्यांच्यावर राजकीय आणि मोठ्या गुंडांचा वरदहस्त असल्याची चर्चा आहे. दरम्यान हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारागृह अधीक्षकांनी गेल्या काही वर्षांपासून कैद्यांसाठी (Prisoners) सकारात्मक उपक्रम राबवले जात आहेत. हे पाहून काही आत्मसंतुष्ट व्यक्तींनी जुन्या क्लिप्स मुद्दाम व्हायरल केल्या आहेत,” असे म्हटले. त्यामुळे आता हे व्हिडीओ कोणी व्हायरल केले? याची चौकशी केली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, सदर फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (Ministerr Girish Mahajan) यांनी हा प्रकार गंभीर असल्याचे म्हटले आहे. तसेच कारागृहात मोबाईल आणि अंमली पदार्थ जातात कसे? याची चौकशी करणार असून, याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कडक कारवाई करू, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता कारागृहातील सुरक्षेमध्ये चूक करणाऱ्या आणि गुन्हेगारांना अंमली पदार्थासह व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्यांवर काय कारवाई होते? याकडे लक्ष लागून आहे.
व्हायरल झालेले फोटो, व्हिडीओ जुने
व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडीओत अनेक सराईत गुन्हेगार असून, हा व्हिडीओ तीन वर्षांपूर्वीचा असल्याचे कारागृह प्रशासनाचे म्हणणे आहे. तसेच व्हिडीओतील गुन्हेगार पुण्यातील असून, मोक्क्यासारख्या गंभीर गुन्ह्यात त्यांना शिक्षा झाली आहे. या गुन्हेगारांनी अनेक फोटो कारागृहातील विविध मोकळ्या जागेत आणि जेलच्या आतील भागात काढलेले आहे. हेच फोटो आता व्हायरल झाले आहेत.




