Thursday, February 12, 2026
HomeनाशिकNashik Crime : घरफोडीत सुमारे ७ लाखांचा ऐवज लंपास

Nashik Crime : घरफोडीत सुमारे ७ लाखांचा ऐवज लंपास

इंदिरानगर | वार्ताहर | Nashik

घरी कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी गौळाणे परिसरातील एका घरात घरफोडी (Burglary) करत सुमारे ७ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंगनाथ अर्जुन मोरे (रा. पांडव वन, गौळाणेपाथर्डी रोड, नाशिक) हे सेवानिवृत्त असून ते पत्नी, मुलगा व सुनेसह राहतात व शेती व्यवसाय करतात.

- Advertisement -

दि. ६ फेब्रुवारी रोजी मोरे कुटुंबीय निफाड (Niphad) येथे शेतीच्या कामानिमित्त गेले होते. दि. ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी घरी परतल्यानंतर त्यांना बेडरूमचा दरवाजा उघडा व घरातील सामान अस्ताव्यस्त अवस्थेत आले. चोरट्यांनी घराच्या आढ ळून खिडकीचे लोखंडी गज कापून काच फोडत घरात प्रवेश केला होता.

YouTube video player

बेडरूममधील लाकडी कपाट फोडून त्यातील सुमारे १६ तोळे सोन्याचे विविध दागिने व ६० हजार रुपये रोख असा एकूण ६ लाख ८३ हजार ४०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेण्यात आला. या घटनेची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात (Police Station) करण्यात आली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik News : ग्रामीण पोलीस भरतीसाठी शहाण्णव हजार अर्ज; ‘या’ तारखेपासून...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक ग्रामीण पोलीस दलातील (Nashik Rural Police Force) ३८० जागांसाठी तब्बल ९६ हजार ९०० अर्ज दाखल झाल्याने भरती प्रक्रियेची स्पर्धा...