Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमNashik Crime : नाशकात बॉम्ब ठेवल्याचे ई-मेल; बीडीडीएसच्या तपासानंतर अफवा उघड

Nashik Crime : नाशकात बॉम्ब ठेवल्याचे ई-मेल; बीडीडीएसच्या तपासानंतर अफवा उघड

नाशिक | Nashik

नाशिक शहरातील (Nashik City) दोन प्रमुख ठिकाणे शक्तिशाली बॉम्बने (Bomb) उडविण्याची धमकी देणारे ई-मेल कॅलिफॉर्निआ देशातून प्राप्त झाल्याने शुक्रवारी एकच खळबळ उडाली होती. शहर पोलीस आयुक्तालयाच्या (City Police Commissionerate) बॉम्ब शोधक व नाशिक पथकाने (बीडीडीएस) शुक्रवारी (दि. ३१) रात्री उशिरापर्यंत गंगापूररोडवरील भोंसला मिलिटरी शिक्षण संस्थेच्या सुमारे १६५ एकरवरील परिसराची कसून तपासणी केली.

- Advertisement -

तर शनिवारी (दि. १) दुपारी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात तपासणी झाली. दोन्ही ठिकाणच्या तपासणीनंतर बॉम्बची अफवा असून, हे ई-मेल फसवे असल्याचे समोर आले. संशयित ई-मेल प्रकरणात पुढील तपासाचे आदेश गुन्हे शाखेला देण्यात आले आहेत.गंगापूररोड परिसरातील (Gangapur Road) भोंसला मिलिटरी स्कूल बॉम्बने उडविण्याची धमकी शुक्रवारी (दि. ३१) प्राप्त झाली.प्राचार्य हेमंत देशपांडे यांनी त्यासंदर्भात पोलीस आयुक्तालयास कळविताच गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव व सहायक आयुक्त संदीप मिटके यांनी ‘बीडीडीएस’ला पाचारण केले.

दरम्यान, पथकाने गंगापूर पोलीस ठाण्याचे (Gangapur Police Station) निरीक्षक सुशील जुमडे यांच्या पथकाला सोबत घेत भोंसलामध्ये तपासणीला सुरुवात केली. त्यावेळी महिला शाळेचा परिसर, वसतिगृह, महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय, डायनिंग हॉल, सर्व मैदाने, विद्या प्रबोधिनीसह संस्थेचा १६५ एकर परिसर पिंजून काढण्यात आला. रात्री उशिरापर्यंत ही तपासणी सुरू राहिल्यानंतर अनोळखी आयडीवरुन ई-मेलद्वारे अफवा पसरविल्याचे पथकाने स्पष्ट केले. दरम्यान, शनिवारी (दि. १) सकाळी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयातही ‘बीडीडीएस’ने तपासणी करुन प्रकरणाची सत्यता पडताळल्याचे समजते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...