नाशिक |प्रतिनिधी | Nashik
एचडीएफसी बँकेत (HDFC Bank) वयोवृद्ध महिलेने (women) एफडी म्हणून ठेवलेले तब्बल ७ लाख रुपये सायबर चाेरट्याने परस्पर लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहर सायबर पोलीस ठाण्यात (City Cyber Police Station) अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदाराच्या संमतीशिवाय अनोळखी व्यक्तीने एचडीएफसी बँकेतील ७ लाख रुपये एफडीवर इंटरनेट बँकिंचा वापर केला. हा प्रकार २० मे २०२३ ते २४ जुलै २०२३ या कालावधीमध्ये घडली. अनोळखी व्यक्तीने ओव्हरड्राफ्ट घेऊन ७ लाख रुपये परस्पर लंपास केला. एफडीची (FD) मुदत संपल्याने रक्कम पुन्हा नव्याने ठेवण्यासाठी महिला बँकेत गेली असता तिचे एफडीचे पैसे अनोळखी व्यक्तीने घेतल्याचे समजते.
दरम्यान, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे करीत आहेत. फसवणूक करणारी व्यक्ती महिलेच्या संपर्कातील असण्याची शक्यता आहे. अशा स्वरुपाचा गुन्हा नाशिक शहरात (Nashik City) पहिल्यांदाच घडला आहे. संशयिताचा शाेध सुरु आहे, अशी माहिती सायबर पाेलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे यांनी दिली.