Saturday, January 24, 2026
Homeक्राईमNashik Crime News : युवकाच्या खूनप्रकरणी सहा जणांना अटक

Nashik Crime News : युवकाच्या खूनप्रकरणी सहा जणांना अटक

नाशिक | Nashik

गेल्या काही दिवसांत नाशिक शहरात (Nashik City) घडलेल्या खुनांच्या घटनांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच काल रात्री पाथर्डी गावात (Pathardi Village) जुन्या वादातून एका युवकाचा (Youth) सहा जणांनी खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र, या खुनातील आरोपींना पोलिसांनी अवघ्या तासाभरात अटक केली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : नाशिककरांना ४५ कोटींचा गंडा; सायबर फ्रॉडच्या गुन्ह्यांचा उच्चांक

YouTube video player

याबाबत अधिक माहिती अशी की, नटेश विजय साळवे (रा.विल्होळी,ता.नाशिक) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.काल (दि.२२ सप्टेंबर) रोजी रात्री नटेश हा पाथर्डी गावातील काजी मंजिल इमारतीसमोरून जात असताना त्याला सहा जणांनी अडविले. यावेळी त्यांनी जुन्या वादातून नटेशवर धारदार शस्त्रांनी (Sharp Weapons) वार करत त्याचा जागीच खून केला.

हे देखील वाचा : नाशकातील चौघांना लाखो रुपयांचा गंडा

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी (Indiranagar Police) घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी मयताचे नातेवाईक शशिकांत गांगुर्डे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत यश उर्फ आयुष दोंदे, प्रफुल्ल दोंदे, दुर्गेश शार्दुल, रोहित वाघ, गौरव दोंदे आणि करण बावळ या सहा आरोपींना एका तासाच्या आत अटक केली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस (Police) निरीक्षक अशोक शर्माळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोनार करत आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो’चे दिमाखदार उद्घाटन

0
नाशिक | प्रतिनिधी Nasik नाशिकमधील घरांचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी हक्काचे व्यासपीठ ठरणाऱ्या दैनिक ‘देशदूत’ आयोजित ‘गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ चे आज (दि. २३ जानेवारी) उत्साही...