Tuesday, February 3, 2026
Homeक्राईमNashik Crime : बागुल समर्थक राजवाडेस 'या' तारखेपर्यंत पोलीस कोठडी; अजयचा 'राईट...

Nashik Crime : बागुल समर्थक राजवाडेस ‘या’ तारखेपर्यंत पोलीस कोठडी; अजयचा ‘राईट हॅन्ड’ अमोलही अटकेत

भुऱ्याकडील रिव्हॉल्व्हर जप्त

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

रामवाडी ते विसे मळा मार्ग (Ramwadi to Vise Mala) आणि ‘ऑरा’ बारमधील गोळीबारात (Firing) राजकीय स्वरुपाच्या गुन्हेगारांची (Criminal) धरपकड झाल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही पोलीस आयुक्तांना ‘फ्री हँण्ड’दिल्याचे स्पष्ट केले आहे.दरम्यान, विसेमळा गोळीबाराच्या गुन्ह्यात अटकेत असलेले मामा राजवाडे यांनी ‘पोलिसांनी मारहाण केली’ असा दावा करून तसा अर्ज न्यायालयासमोर सादर केला. तर आयटीआय सिग्नल गोळीबारातील लोंढे टोळीच्या संशयितांची घरझडती सुरुच असून शुभम् उर्फ भुऱ्या याने वापरलेले रिव्हॉल्व्हर व भूषणला पळून जाण्यासाठी वापरलेली वाहने सातपूर पोलिसांनी जप्त केली आहेत.

- Advertisement -

विसे मळा गोळीबार प्रकरणात भाजप नेते सुनील बागूल (Sunil Bagul) यांचे समर्थक बाबासाहेब ऊर्फ मामा वाल्मिक राजवाडे आणि अमोल पाटील या दोघांना गुन्हे शाखेने अटक (Arrested) केली. त्यांना नाशिक न्यायालयाने (Nashik Court) सोमवारपर्यंत (दि. १३) पोलीस कोठडी सुनावली. न्यायालयात जाण्यापूर्वी राजवाडे व पाटील यांनीही ‘नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला’ अशी घोषणा दिली. सचिन साळुंखे या तरुणावर गोळीबार झाल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा नोंद आहे. याप्रकरणी भाजप नेते सुनील बागूल यांना पाच दिवसांपूर्वीच तंबी दिली होती.

YouTube video player

दरम्यान, या प्रकरणातील मुख्य संशयित अजय बागूल अद्याप पसार असून, गुरुवारी (दि. ९) मामा राजवाडे याची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. राजवाडेसह पाटीलला शुक्रवारी (दि. १०) अटक झाली. त्यांना न्यायालयात (Court) हजर केल्यावर राजवाडेने चक्कर येत असल्याचा दावा केला. न्यायालयीन आदेशानुसार पुन्हा वैद्यकीय तपासणी झाल्यावर त्याच्यातक्रारीत कसलेही तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे न्यायालयाने पोलीस कोठडी (Police Custody) कायम ठेवली. दरम्यान, गोळीबार करणारे तुकाराम चोथवे, अजय बोरीसा हेदेखील पसार आहेत. सुनील बागूल स्वतःसह पुतण्यांच्या बचावासाठी मुंबईत प्रयत्न करीत असल्याचे कळते.

गुन्ह्यात सर्वांचा रोल निष्पन्न

आयटीआय सिग्नल परिसरात ऑराबारबाहेर झालेल्या राड्यातून गोळीबार केल्याप्रकरणी रिपाइंचे पदाधिकारी प्रकाश लोंढे, त्यांचा मुलगा दीपक व भूषण लोंढेसह इतर संशयितांवर गुन्हा नोंद आहे. यासह अपहरण, खंडणी, फसवणुकीचेही गुन्हे त्यांच्यावर नोंद झाले असून, भूषण पसार आहे. प्रकाशसह अटकेत असलेल्या इतर संशयितांना १२ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गोळीबारात वापरलेली रिव्हॉल्वर पोलिसांनी जप्त केली असून, संशयितांच्या घरांची झडती सुरू आहे. सीसीटीव्हीनुसार भूषणचा माग काढण्यात येत असून, त्याला पसार होण्यासाठी वापरलेली वाहने जप्त झाली आहेत. त्या दोनवाहनचालकांनाही ताब्यात घेतले आहे. आँरा बारवर कब्जा व खंडणीची रक्कम तिप्पट करण्यासाठी लोंढे गैंगने गोळीबाराचा ‘डाव’ आखल्याची माहिती तपासात समोर येत आहे. दरम्यान, संशयितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. सीसीटीव्ही फुटेजनुसार सर्वांचे सहभाग निष्पन्न होत असल्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश आहिरे यांनी सांगितले.

असा झाला युक्तिवाद

राजवाडे याची शुक्रवारी सकाळीपासून शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने तब्बल दहा तास चौकशी केली व त्यास दुपारी अटक केली, त्याचबरोबर त्याचा समर्थक असलेल्या अमोल पाटीलला देखील अटक केली. दोघांनाही मुख्य न्यायदंडाधिकारी बी. एस. इचपुराणी यांच्या न्यायालयात हजर केले होते. बचाव पक्षातर्फे अॅड. राहुल कासलीवाल व अॅड. मंदार भानोसे यांनी युक्तीवाद करताना पोलीस कोठडी न देता, न्यायालयीन कोठडीची विनंती केली. अॅड. कासलीवाल यांनी राजवाडे यास पोलिसांनी मारहाण केल्याबाबतचा अर्ज सादर केल्याने मुख्य न्यायदंडाधिकारी इचपुराणी यांनी पोलिसांना राजवाडे याची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, राजवाडे याचीवैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याची रवानगी कोठडीत करण्यात आली. दरम्यान, सहाय्यक सरकारी अभियोक्ता शैलेंद्र बागडे यांनी, घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहेत. त्यात संशयितांचा सहभाग असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणात वापरलेले वाहन जमा करण्यात आले आहे. तसेच वापरलेले शस्त्र हस्तगत करणे बाकी असल्याने कोठडीची गरज असल्याचा युक्तिवाद केला.

ठळक मुद्दे

  • प्रकाश लोंढेच्या विविध अनधिकृत बांधकामांवर मनपाची टाच.
  • पोलीस बंदोबस्तात नोटिसा चिकटवल्या.
  • गुन्हात नव्याने देवेश शिरताटे व शुभम गोसावीला अटक.
  • आतापर्यंत प्रकाश लोंढेसह ९ जण अटकेत

ताज्या बातम्या

Praful Patel : प्रफुल पटेलांनी घेतली पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांची...

0
दिल्ली । Delhi महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल...