Sunday, January 25, 2026
HomeनाशिकNashik Crime : सातपूर ऑरा बार गोळीबार प्रकरणातील मुख्य सूत्रधार भूषण लोंढेच्या...

Nashik Crime : सातपूर ऑरा बार गोळीबार प्रकरणातील मुख्य सूत्रधार भूषण लोंढेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

नाशिक | Nashik

सातपूर ऑरा बार गोळीबार प्रकरणी (Satpur Aura Bar Firing Case) फरार मुख्य संशयित लोंढे टोळीचा (Londhe Gang) मोरक्या भूषण लोंढे आणि त्याचा साथीदार प्रिन्स सिंग यास नेपाळ सीमेवरून गुन्हेशाखा युनिट दोनच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

सातपूर पोलीस ठाण्याच्या (Satpur Police Station) हद्दीतील हॉटेल ऑरा बार येथे गोळीबार केल्यानंतर लोंढे टोळीचा मुख्य सूत्रधार भूषण प्रकाश लोंढे आणि त्याचा साथीदार प्रिन्स सिंग हे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते. त्यांची शोधासाठी विविध राज्यात नाशिक पोलिसांनी पथके रवाना केली होती. तर भूषणचे वडील प्रकाश लोंढे आणि भाऊ दीपक लोंढे यांना खंडणीच्या गुन्ह्यात अटक करत त्यांचा ‘नाशिकच्या बालेकिल्ल्यात’ ऐन दिवाळीत चांगलाच पाहुणचार केला होता.

YouTube video player

दरम्यान, भूषण लोंढे विरोधात भारतीय न्याय संहिता, फौजदारी सुधारणा कायदा, हत्यारे कायदा, मपोका आणि मकोका या विविध कलमांन्वये गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यातच त्याने सातपूर (Satpur) येथील ऑरा बारमध्ये गोळीबार करून पळ काढला होता.अखेर पोलिसांना त्याच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे.

यांनी बजावली कामगिरी

ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त गुन्हे किरणकुमार चव्हाण, उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक आयुक्त गुन्हे संदीप मिटके, सहाय्यक आयुक्त अंबड विभाग डॉ.सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ.समाधान हिरे, श्रेणी उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी सहाय्यक उपनिरीक्षक शंकर काळे, हवालदार सुनील आहेर, प्रकाश महाजन, अतुल पाटील, अंमलदार महेश खांडबहाले, तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे यांच्या पथकाने केली.

ताज्या बातम्या

राज-का-रण : सिव्हिलची ‘शल्यक्रिया’ कधी होणार ?

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक सिव्हिल हॉस्पिटल हे खरंतर गोरगरिबांना चांगले उपचार मिळवून देऊन त्यांचे आशीर्वाद घेण्याचे ठिकाण. तेथे आरोग्याच्या दर्जेदार...