Tuesday, February 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : बडतर्फ पोलिसाचा संशयास्पद मृत्यू; नशेचा 'ओव्हरडोस' की हृदयविकाराचा झटका?

Nashik News : बडतर्फ पोलिसाचा संशयास्पद मृत्यू; नशेचा ‘ओव्हरडोस’ की हृदयविकाराचा झटका?

नाशिक| प्रतिनिधी| Nashik

सराईत गुन्हेगारांच्या (Criminal) संपर्कात असल्याने सात महिन्यांपूर्वी नाशिक शहर पोलिस (Nashik City Police) दलातून बडतर्फ केलेल्या तत्कालीन पोलिस कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. इरफान मन्सूर शेख (वय ३५, रा. गरीब नवाज काॅलनी, वडाळागाव) असे मृताचे नाव आहे. शवविच्छेदनानंतर ‘व्हिसेरा’ राखून ठेवण्यात आला असून, इरफानने आत्महत्या केली की, नशेच्या ‘ओव्हर डोस’मुळे त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला यासंदर्भातील तपास सुरू आहे.

- Advertisement -

भद्रकाली पोलिसांच्या (Bhadrakali Police) हद्दीत असलेल्या सिंग पॅलेस लॉजमधील खोलीत शनिवारी (दि. ३१) रात्री साडेनऊ वाजता मृतावस्थेत इरफानचा मृतदेह (Dead Body) आढळला. रविवारी (दि. १) सकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यावेळी इरफानच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होत नसल्याने ‘व्हिसेरा’ राखून ठेवण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळी उशिराने इरफान हा अहमदाबाद येथून नाशिकमध्ये परतला होता. भद्रकाली हद्दीत एका लॉजमध्ये मुक्कामासाठी गेल्यावर हा प्रकार घडला. सिगारेट व अन्य नशेत त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. भद्रकाली पोलिसांत अकस्मात मृत्यू नोंद असून,पुढील तपास सुरू आहे.

YouTube video player

दरम्यान, इरफान हा सन २०१४ मध्ये नाशिक शहर पोलिस दलात भरती झाला होता. त्याने अनेक गुन्ह्यांच्या तपासातही चांगली कामगिरी बजावली होती. मात्र, जुलै २०२४ मध्ये मुंबई नाका हद्दीतल्या बजरंगवाडीत झालेल्या दंगलीत सहभाग असल्याचा संशयातून पोलिस शिपाई असलेल्या इरफान याच्याविरुद्ध गुन्हा नोंद होत अटक (Arrested) झाली होती. निलंबनानंतर खात्यांतर्गत विभागीय चौकशीत दोषारोप सिद्ध झाल्याने त्याला १७ जून २०२५ रोजी बडतर्फ करण्यात आले होते.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अहिल्यानगर महापालिकेत पक्षातंर्गत सव्वा-सव्वा वर्षाचा फॉम्युला

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या (सोमवार) दिवशी, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युतीने सत्तेचा स्पष्ट फॉर्म्युला...