Friday, April 25, 2025
Homeक्राईमNashik Crime : टीडीआरप्रकरणी अटक होणार?

Nashik Crime : टीडीआरप्रकरणी अटक होणार?

न्यायालयाने तिघांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले

नाशिक | Nashik

मिळकतीचे बनावट दस्तऐवज तयार करत वारसदारांच्या अंगठ्यांचे खोटे ठसे, सह्या करून तब्बल आठ कोटींच्या टीडीआर फसवणूक (TDR Fraud) प्रकरणात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. यु. जे. मोरे यांनी तिघा संशयितांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले आहेत. यामुळे पोलिसांकडून (Police) संशयितांना (Suspected) अटक केली जाण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

नाशिक शिवारातील सर्व्हे क्र.२७४/१/१अ/२ मधील वडिलोपार्जित मिळकतीबाबत फिर्यादी कल्पना निवृत्ती गोंदके (३२, रा. आहुर्ली) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) फिर्याद दिली आहे. यानुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मुख्य संशयित राजेश दत्तात्रय साळुंके, वीरेंद्र नारायण वानखेडे, संजय दत्तात्रय साळुंके यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला जातो.

त्यावर सुनावणी झाली असता न्यायालयाने (Court) तिघांचे जामीन (Bail) अर्ज फेटाळून लावत टीडीआरचा हा घोटाळा असून यामध्ये काही महापालिका व महसूल अधिकाऱ्यांच्या सहभागाची शक्यता आहे का ? अशी शंका घेत योग्य तपास करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याची माहिती गोंदके यांच्या वतीने ॲड. विवेकानंद जगदाळे यांनी दिली.

दरम्यान, सरकार पक्षाकडून अॅड. रवींद्र निकम यांनी बाजू मांडली. या प्रकरणात शासकीय लोकसेवकांच्या सहभागाची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे कागदोपत्री पुरावे गोळा करण्याचे काम सुरु असून त्यानुसार पोलीसांकडून तपासाला दिशा दिली जात आहे. त्यामुळे आता सरकारवाडा पोलीसांकडून तपासाला कशी गती दिली जाते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...