Tuesday, February 3, 2026
Homeक्राईमNashik Crime : मैत्रिणीनेच मारला अडीच लाखांवर डल्ला

Nashik Crime : मैत्रिणीनेच मारला अडीच लाखांवर डल्ला

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

बँकेत (Bank) भरण्यासाठी घरात ठेवलेली २ लाख ४० हजार रुपयांची रोकड मैत्रिणीनेच (Friend) आपल्या साथीदाराच्या मदतीने चोरून नेल्याची घटना मुक्ताईनगर, टाकळी रोड परिसरात घडली आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात (Upnagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

सोफिया रोहित डिंगम (वय २९, रा. आराध्य रो-हाउस, मुक्ताई हॉस्पिटलजवळ, टाकळी रोड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या आणि त्यांची मैत्रीण मानसी सुर्वे व नेहा जाधव या गेल्या दोन महिन्यांपासून भाड्याने एकत्र राहत होत्या. यापैकी नेहा जाधव ही गावी गेल्याने घरात (House) सोफिया डिंगम व मानसी सुर्वे या दोघीच राहत होत्या. दि. २५ जानेवारी रोजी सोफिया डिंगम यांच्या आई रीना मेस्सी यांनी बँकेत भरण्यासाठी २ लाख ४० हजार रुपये त्यांच्याकडे दिले होते.

YouTube video player

दरम्यान, ही रक्कम त्यांनी घरातील कपाटात ठेवली होती. त्याच रात्री मानसी सुर्वे हिने तिचा मित्र श्रेयस खाडे याला घरी बोलावून घेतले. रात्री जेवणानंतर सर्वजण झोपले असताना मानसी सुर्वे व श्रेयस खाडे यांनी संगनमत करून कपाटातील रोकड चोरून नेली. सकाळी रक्कम गायब असल्याचे लक्षात येताच सोफिया डिंगम यांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मानसी सुर्वे व श्रेयस खाडे यांच्याविरोधात गुन्हा (Case) दाखल केला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अहिल्यानगर महापालिकेत पक्षातंर्गत सव्वा-सव्वा वर्षाचा फॉम्युला

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या (सोमवार) दिवशी, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युतीने सत्तेचा स्पष्ट फॉर्म्युला...