Thursday, November 7, 2024
Homeक्राईमNashik Crime : नाकाबंदी दरम्यान ३३ लाख रुपये जप्त; तालुका पोलिसांची दुगावला...

Nashik Crime : नाकाबंदी दरम्यान ३३ लाख रुपये जप्त; तालुका पोलिसांची दुगावला कारवाई

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) प्रचार सुरु झाला असून त्याच धामधुमीत बेकायदेशिरपणे तेहतीस लाख रुपयांची बेहिशेबी रक्कम कारमधून नेणाऱ्या दाेघांना नाशिक तालुका पाेलिसांनी (Nashik Taluka Police) ताब्यात घेतले आहे. तालुक्यातील दुगाव येथे (दि. ६) रात्री ही कारवाई करण्यात आली असून पाेलिसांनी आयकर विभागासह एसएसटी पथकास कळविले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime : ईव्हीएम हॅक करुन देण्याची बतावणी करणारा अटकेत

विधानभा निवडणुकीची आचारसंहिता लागू (Code of Conduct) असून उमेदवारी अर्ज व छाननीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे काेणत्या उमेदवारांत सरळ लढत हाेणार आहे, याची कल्पना सर्वांना आली आहे. त्यामुळे उमेदवारांनी डाेअर टू डाेअर प्रचारासह विविध भागांत यंत्रणा राबवून प्रचार सुरु केला आहे. याच प्रचारादरम्यान, निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन हाेणार नाही, तसेच मतदारांना कुणीही प्रलाेभन दाखवू नये किवा तत्सम प्रकार टाळण्यासाठी निडवणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पाेलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पाेलीस आयुक्त संदिप कर्णिक, पाेलीस अधिक्षक विक्रम देशमाने, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डाॅ. शशिकांत मंगरुळे, अपर अधिक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या सूचनेने उपनगरे, गावे, राज्यमार्गांवर एसएसटी पथके कार्यरत करण्यात आली आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime : नाशिक शहरासह जिल्ह्यातून वीस सराईत तडीपार

दरम्यान, याच पथकांसह त्या त्या पाेलीस ठाण्यांचे अधिकारी व पथक संशयास्पद मालट्रक, कार व वाहनांची तपासणी करत आहेत. बुधवारी(दि. ७) रात्री गिरणारेजवळील दुगाव येथे तालुका पाेलीस ठाण्याचे निरीक्षक सत्यजित आमले व पथकाने नाकाबंदीत संशयास्पद कार अडवून तिची तपासणी केली. तेव्हा कारमध्ये ३३ लाख ७ हजारांची राेख रक्कम आढळून आली. या रकमेबाबत कारमधील दाेघांकडे विचारणा केली असता, त्यांना तपशिल देता आला नाही. त्यामुळे ही रक्कम जप्त करण्यात आली असून कायदेशिर प्रक्रिया करुन आयकर विभागाकडे (Income Tax Department) हस्तांतरित करण्यात आली आहे. संशयितांकडे पाेलीस व निवडणूक पथक चाैकशी करत असल्याचे आमले यांनी सांगितले. संशयित नाशिकमधन दुगावमार्गे गिरणारे येथे जात हाेते, अशी माहिती समाेर आली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या