Wednesday, October 30, 2024
HomeनाशिकNashik Crime News : प्रवाशांचे दागिने चोरणारा गजाआड

Nashik Crime News : प्रवाशांचे दागिने चोरणारा गजाआड

युनिट एकची सीबीएसजवळ कामगिरी, ३० गुन्ह्यांत वाॅन्टेड

नाशिक | Nashik

बसस्थानकांतील (Bus Stand) गर्दीत (Crowd) बसमधील सीट पकडण्यासाठी चढाओढ करणाऱ्या महिलांचे (Women) दागिने चाेरुन नेणाऱ्या श्रीरामपुरातील सराईत चाेरट्यास पकडण्यात यश आले आहे. गुन्हेशाखा युनिट एकने हालचाली हेरुन या चाेरट्यास गजाआड केले असून त्याच्यावर अशाच स्वरुपाचे ३० गुन्हे दाखल आहे. त्यात सरकारवाडा हद्दीतील पाच गुन्हे उघड झाले आहेत. साहील निसार पठाण (२३, रा. ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) असे संशयिताचे नाव आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Political : शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

दिवाळीनिमित्त (Diwali) सुट्टी सुरु असल्याने अनेकजण सहकुटूंब बाहेरगावी जात आहेत. त्यामुळे शहरातील ठक्कर बसस्थानक, नविन बसस्थानक व महामार्ग बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी आहे. याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी प्रवाशांना लक्ष करीत त्यांच्याकडील सोन्याचे दागिने चोरण्यास सुरुवात केली. एकापाठोपाठ एक चोऱ्या होत असल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. त्यामुळे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांच्या आदेशानुसार, गुन्हे शाखेचे पोलिस उपआयुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांनी युनिट एकला चोरट्यास पकडण्याच्या सुचना केल्या.

हे देखील वाचा : Nashik Crime News : १०१ किलो गांजासह ‘इतक्या’ लाखांचा मुद्देमाल जप्त; इगतपुरी पोलिसांची मोठी कारवाई

युनिट एकचे पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ठक्कर बसस्थानक येथे सापळा रचला. संशयित चोरटा तेथे आल्यानंतर पोलिसांनी त्यास पकडले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून त्याने प्रवाशांचे दागिने चोरल्याची कबुली दिली. तसेच त्याच्या ताब्यातून साडे चार तोळे वजनाची ३ लाख ५० हजार रुपयांचे सोन्याची (Gold) लगड जप्त केली आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : स्टेट बँकेतून २५ लाखांची चोरी

दरम्यान, त्याने सरकारवाडा येथील चार व मुंबईनाका पोलिस ठाण्याच्या (Mumbai Naka Police Station) हद्दीतील एक चोरीची कबुली दिली आहे. त्यास न्यायालयाने गुरुवारपर्यंत (दि.३१) पोलिस कोठडी सुनावली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक रवींद्र बागुल, हवालदार प्रशांत मरकड, विशाल काठे, विशाल देवरे, सुक्राम पवार यांच्या पथकाने ही कामगिरी केली. त्याच्याकडून अशाच स्वरुपाचे इतर गुन्हे उघड हाेण्याची दाट शक्यता आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या